पठाण अमरजान राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्काराने सन्मानित
बीड (प्रतिनिधी) :- येथील साप्ताहिक माझी नगरीचे संपादन तथा मीडिया सेंटरचे प्रमुख पठाण अमरजान आजम खान यांना राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ व महिला विकास संघाच्या वतीने राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.
असे की येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे दि. 3 जानेवारी रोजी दुपारी 1 : 00 वा. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ व महिला विकास संघाच्या वतीने राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमात माजी मंत्री प्रा.सुरेश नवले,माजी उपनगर अध्यक्ष फारुक पटेल,जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुरेश साबळे,गटविकास अधिकारी सचिन सानप,जिल्हा ग्रंथालय
अधिकारी संजय मस्के,सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे,दिनेश पवार,डॉ.लक्ष्मण जाधव,सिमा ओस्तवाल,इंजिनीयर अखिल फारुकी, महाराष्ट्र म.पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक भागवत वैद्य आदी मान्यवरांच्या हस्ते पठान अमरजान आजम खान यांना राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमात उपस्थित डॉ.महावीर बडजाते,डॉक्टर संजय तांदळे,मुक्त पत्रकार एस.एम युसुफ,सय्यद मोहम्मद इलियास,पठाण असद जान,शेख शोहेब,अन्वर बागवान आदींनी पठाण अमरजान यांना शुभेच्छा दिल्या
0 Comments