google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक घटना.. नात्याला काळीमा! पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Breaking News

धक्कादायक घटना.. नात्याला काळीमा! पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

धक्कादायक घटना.. नात्याला काळीमा! पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार  

धरणगाव : तालुक्यातील एका खेडेगावात पित्यानेच आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप मुलीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रानुसार, अल्पवयीन मुलगी तिची आई व वडिलांसोबत वास्तव्यास आहे. मुलीचे तिच्या वडिलांनी काही महिन्यांपूर्वी तिच्या मनाविरुद्ध एका तरुणासोबत विवाह करून दिला. लग्नानंतर मुलीला तिचा पती हा दारू पिऊन भांडण तसेच मारहाण करत असल्याने त्रासाला कंटाळून सात ते आठ महिन्यानंतर अल्पवयीन मुलगी ही दुसऱ्या राज्यात म्हणजे, गुजरात, सुरत येथे पळून गेली होती.

मारहाण करत केला अत्याचार

पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिला परत आणले होते. त्यानंतर तिला बालकल्याण समिती जळगाव येथे दाखल केले होते. या ठिकाणी एक ते दोन महिने राहिल्यानंतर मुलगी पुन्हा तिच्या आई वडिलांसोबत राहण्यास गावी गेली. यादरम्यान दोन तीन महिने उलटल्यानंतर मुलीवर तिच्या बापानेच जबरदस्तीने मारहाण करत अत्याचार करायला सुरुवात केली.

नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल

पाच ते सहा महिन्यापर्यंत अश्लिल व्हिडिओ दाखवून बापाने मुलीवर अत्याचार केले. याला विरोध केल्यानंतर बाप मुलीला मारहाण करत असे. या घाणेरड्या प्रकाराला कंटाळून मुलीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ करत आहेत.

Post a Comment

0 Comments