गरिबांच्या दुकानावर जेसीबी चालवणे भोवलं, पडळकरांच्या भावासह 100 जणांवर गुन्हा दाखल
सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात रात्रीच्या अंधारात दुकानं आणि हॉटेल जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आले आहे.
या प्रकरणी अखेर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांच्यासहीत 100 जणावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात मध्यरात्री दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या अंधारात ही कारवाई करण्यात आली आहे.
ब्रह्मानंद पडळकर यांनी बेकायदेशीरपणे जागेचा ताबा घेण्याच्या उद्देशाने सात मिळकती पाडल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. अखेर या प्रकरणी सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासहीत 100 जणावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदेशीर जमाव जमवून मालमत्तेचे नुकसान केलं. बेकायदेशीरपणे लोकांच्या मालमत्तेत घुसून नुकसान करणे, लोकांना मारहाण केली. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला. या प्रमाणे 12 कलमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे.


0 Comments