google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला मेडशिंगी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आबा-बापू गटाच्या सौ.उमा इंगवले तर उपसरपंचपदी अमर गोडसे यांची बिनविरोध निवड

Breaking News

सांगोला मेडशिंगी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आबा-बापू गटाच्या सौ.उमा इंगवले तर उपसरपंचपदी अमर गोडसे यांची बिनविरोध निवड

  सांगोला मेडशिंगी ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदी

आबा-बापू गटाच्या सौ.उमा इंगवले तर उपसरपंचपदी अमर गोडसे यांची बिनविरोध निवड

सांगोला : मेडशिंगी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आबा-बापू गटाच्या सौ.उमा प्रतापसिंह इंगवले यांची तर उपसरपंच पदी अमर गोडसे यांची बिनविरोध निवड झाली असून निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या हस्ते नूतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार सांगोला येथे करण्यात आला. 

यापूर्वीच्या सरपंचांनी ठरल्याप्रमाणे मुदतीत राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या मेडशिंगी ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी शुक्रवार दि.३० डिसेंबर रोजी वरीलप्रमाणे बिनविरोध निवड करण्यात आली. आबा-बापू गट व शे.का.प.आघाडीतून सदरच्या निवडी पार पडल्या. निवडीनंतर गावातील कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करीत आनंद साजरा केला.

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीनंतर राजकारण बाजूला ठेवून गावच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित येऊन प्रयत्न करावा. 

विकास कामामध्ये राजकारण करु नये,गांवच्या सर्वांगीण विकास कामांमध्ये अडीअडचणी व अडचणी निर्माण होत असतील तर, त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे,असे दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुणभाऊ शेंडे, उद्योगपती भाऊसाहेब रुपनर, 

माजी सरपंच संजयनाना रुपनर, माजी सरपंच रामलिंग झाडबुके, माजी सरपंच विजयबापू इंगवले, माजी जि.प.सदस्य कल्पनाताई शिंगाडे, तुकाराम इंगवले, संजय आलदर, बिरासो बुरले, बाळासाहेब लेंडवे, नितीन वसेकर, सोमनाथ आळतेकर, 

चंद्रकांत सोनलकर, राजेंद्र लवटे आदी  उपस्थित होते. यासमयी,निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी ननवरे यांनी काम पाहिले. याप्रसंगी, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

0 Comments