google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्षपदी अभिषेक कांबळे यांची निवड.

Breaking News

सांगोला काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्षपदी अभिषेक कांबळे यांची निवड.

सांगोला काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्षपदी अभिषेक कांबळे यांची निवड.  

सांगोला:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी टिळक भवन मुंबई यांच्या कडून सोलापूर जिल्ह्यातील तालुका अध्यक्षांच्या निवडी नुकत्याच जाहीर केल्या असून तालुका अध्यक्ष म्हणून अभिषेक भैया कांबळे यांची निवड पक्षश्रेष्ठींनी केली आहे.

त्यामुळे तालुक्यात नवा गडी नवं राज्य येवून सांगोला तालुक्यातील काँग्रेस पक्षात बळकटी येणार असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यातून बोलले जात आहे

29 डिसेंबर 2022 च्या पत्रानुसार काँग्रेसचे सरचिटणीस संघटन व प्रशासन प्रमुख देवानंद पवार यांच्या आदेशान्वये सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली

 सांगोला तालुका अध्यक्षपदी महूद येथील युवा कार्यकर्ते अभिषेक भैया कांबळे यांची निवड केली आहे. 

प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, काँग्रसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आम प्रणितीताई शिंदे, धवलसिंह मोहिते पाटील, ज्येष्ठ नेते प्रा प्रबुद्धचंद्र झपके आदींच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

 काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याने मला काँग्रेस पक्षात काम करण्याची संधी मिळाली आहे. शासकिय योजना तळागाळापर्यंत पोहचवून येणाऱ्या काळात पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. युवकांचा लढा उभा करून पक्ष संघटना बळकट करण्याचा मानस असल्याचे नूतन तालुका अध्यक्ष अभिषेक भैया कांबळे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments