google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लग्नासाठी नवरी मिळेना, नोकरी, संपत्ती अन् मालमत्तेचा काय उपयोग लग्नासाठी कर्ज द्यायला बँका तयार; पण बिचाऱ्याला नवरी कोण देणार ?

Breaking News

लग्नासाठी नवरी मिळेना, नोकरी, संपत्ती अन् मालमत्तेचा काय उपयोग लग्नासाठी कर्ज द्यायला बँका तयार; पण बिचाऱ्याला नवरी कोण देणार ?

लग्नासाठी नवरी मिळेना, नोकरी, संपत्ती अन् मालमत्तेचा काय उपयोग लग्नासाठी कर्ज द्यायला बँका तयार;

पण बिचाऱ्याला नवरी कोण देणार ?

 सोलापूर: तुळशी विवाहानंतर लग्नाची लगबग सुरू होते. पैसा-पाणी व्यवस्थित राहिलं तर 'चट मंगनी पट ब्याह' असं धोरण अनेकजण आखतात; परंतु हातात पैसा नाही तर बँक कर्ज देते. मात्र, लग्नासाठी नवरी कोण देणार, असा प्रश्न तरुण विचारत आहेत.

 लग्नाचे वय उलटत चालले तरी मुलगी मिळत नसल्याने अनेक तरुणांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होत आहे. नवऱ्या मुलीसाठी लाखो रुपयाचा खर्च केला जात आहे. तरीही मुलांना लग्नासाठी मुली मिळणे अवघड झाले आहे. विशेष करून ग्रामीण भागात बेरोजगार व शेतकरी मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे दुरापास्त झाले आहे.

 घटस्फोटाचं प्रमाण वाढलं

तरुण पिढीची समजून घेण्याची क्षमता कमी झाली आहे. दोघांचा इगो प्रॉब्लेम आणि दोघेही आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने आता पुढे काय होईल, याची चिंताही नसल्यामुळे घटस्फोटांचे प्रमाण अधिक आहे. घटस्फोटिताना पुन्हा लग्न करायचय मात्र, नव्यासीच करायचं असल्याची बाब वधू-वर सूचक मंडळात नोंदलेल्या माहितीवरून पुढे आली आहे.

 कर्ज मिळतं; नवरी मिळेना

 लग्नासाठी कोणतीही व्यक्ती ५० हजार ते २० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. वयाच्या २१ व्या वर्षांनतर तुम्ही हे कर्ज घेऊ शकता. जे फेडण्यासाठी तुम्हाला ५ वर्षांपर्यंतची मुदत दिली जाते. जरी बँकेकडून लोन घेतल तरी लग्नासाठी नवरी मिळेना राज्यातील मुलींचे एक हजार पुरुषांमागील जन्मदर प्रमाण वर्ष (२०२१) प्रमाण (८५०)

 काय म्हणतात वधू-वर सूचक मंडळ प्रत्येक तरुणीला भरमसाठ पगार, नोकरी करणारा, फक्त भरघोस पगार नाही तर गावी शेती आणि घर, मुलगी पुणे-मुंबईत राहणारी असेल तिला मुलाकडे गावी शेती आणि घर असावे अशी अपेक्षा असल्याचे वधू-वर सूचक मंडळ चालकानी सांगितले.शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न जमणार कसे ?

 लग्नासाठी प्रत्येक मुलगी नोकरीवाला नवरदेव पाहिजे, अशी अपेक्षा बाळगत. मग शेतकयांच्या मुलाला मुलगी देणार तरी कोण ? हा गंभीर प्रश्न मुलाच्या आई-वडिलांसमोर उभा आहे. मुलगा शेती करतोय म्हटल्यानंतर मुलीच्या आई-वडिलाअगोदरच मुलीचा नकार असतो.

Post a Comment

0 Comments