देवाचा प्रसाद देतो असे सांगून एका ६० वर्षीय वृद्धाने एका ११ वर्षीय मुलीवर बलात्कार
मुंबई : देवाचा प्रसाद देतो असे सांगून एका ६० वर्षीय वृद्धाने एका ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना सुकापूर पनवेल येथे घडली आहे. आरोपी आणि फिर्यादी कुटुंब एकाच इमारतीची राहायला होते. या प्रकरणी पीडित बालिकेच्या वडिलांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, संशयित आरोपी विश्वनाथ गिते याला अटक करण्यात आली आहे.
तीन दिवसांपासून संबंधित पीडित बालिका घरी नाराज होती. तेव्हा तिच्या आईने तिला तिच्या नाराजीचे कारण विचारले. तेव्हा बालिकेने शेजारच्या आजोबांनी केलेल्या कृत्याची माहिती दिली.
हा सर्व प्रकार ऐकून पीडितेच्या आईला धक्का बसला आणि आजोबांनी केलेल्या कृत्याबद्दल आईने घडलेली घटना पीजित बालिकेच्या वडिलांना सांगितली नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी मुलगी शाळेत जात नसल्याने तिच्या वडिलांनी तिची विचारणा केली आणि पीडित बालिका व तिच्या आईने घडलेला सर्व प्रकार वडिलांना सांगितला.
त्यानंतर या प्रकरणी संबंधित कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली.
पीडित बालिका व गीते यांच्या घरातली नातवंडे एकत्र खेळत असत, तीन दिवसांपूर्वी जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस
गीते यांनी इमारतीमधील सर्वांना प्रसाद वाटला. मात्र, पीडित बालिकेला स्वतःच्या खोलीत कोणीही नसताना नेले.
त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. या प्रकाराने धक्का बसल्याने पीडीत बालिका घाबरली होती.
तिने याबाबत कोणालाही काही सांगितले नाही. मात्र, ती गप्प व नाराज असल्याने तिच्या आईला काहीतरी चुकीचे असल्यासारखे वाटले. त्यानंतर आईने आणि वडिलाने विचारणा केल्यानंतर घडलेल्या कृत्याची माहिती बालिकेने दिली.
ही माहिती मिळताच वडिलांनी थेट खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्याशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने गीते याला अटक केली असून, त्याच्यावर विनयभंग, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. न्यायालयाने ६० वर्षीय गीतेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


0 Comments