google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला - कोळा प्राथमिक आरोग्य केंद्राची निवासी इमारत सलाईनवर : प्रशासनाचे दुर्लक्ष आरोग्य कर्मचारी जगताहेत मरण यातना

Breaking News

सांगोला - कोळा प्राथमिक आरोग्य केंद्राची निवासी इमारत सलाईनवर : प्रशासनाचे दुर्लक्ष आरोग्य कर्मचारी जगताहेत मरण यातना

सांगोला - कोळा प्राथमिक आरोग्य केंद्राची निवासी इमारत सलाईनवर

: प्रशासनाचे दुर्लक्ष 
आरोग्य कर्मचारी जगताहेत मरण यातना


कोळा वार्ताहर : - नागरिकांच्या आरोग्यासाठी शासन अनेक आरोग्य योजना राबवत असून याचा फायदा सर्व नागरिकांना होत असून लोकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी  आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस झटून नागरिकांची सेवा करत आहेत. पण याच आरोग्य कर्मचाऱ्यांना आता  सुरक्षित निवासा अभावी आपला जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली आहे. 

 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासाची सोय शासनाच्या वतीने केली आहे. परंतु सांगोला तालुक्यातील कोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यासाठी असणाऱ्या निवासी गृहाची दुरवस्था झाली असून येथील कर्मचारी आपला जीव मुठीत घेवून या ठिकाणी रहात आहेत. 

कोळा येथील आरोग्य कर्मचाऱ्यासाठी असलेले  निवासी गृहाचे बांधकाम फार जुने असून आज पर्यंत कोणत्याही प्रकारची डागडुजी झाली नाही. काही इमारतीच्या छतांचा भाग कोसळला आहे तर काही  इमारतीचे छत कधी कोसळेल याचा नेम नाही तरीही अशा अवस्थेत हि कर्मचारी या ठिकाणी  भीतीच्या छायेखाली आपल्या कुटुंबासह राहून नागरिकांची सेवा करत आहेत.

 पावसाळ्यामध्ये छतामधून पाण्याच्या धारा कोसळत असल्याने येथील कर्मचाऱ्यानी  पदरमोड करून पावसाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी छतावर ताडपत्री घातली आहे. इमारतीच्या बाहेरील बाजूच्या काही भिंती जीर्ण झाल्या आहेत. तर काही इमारतीच्या आतमधील फरश्या निघाल्या आहेत.

यश याविषयी कोळा प्राथमिक केंद्राशी संपर्क साधला असता नवीन बांधकाम मागील दीड वर्षापासून  प्रस्ताव पाठवला असून पाठपुरावा सुरु असल्याचे आरोग्य अधिकारी मोहिते यांनी सांगितले. तसेच निवासी गृहाच्या डागडुजीचे काम करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. 

कोळा याठिकाणी असलेले  प्राथमिक आरोग्य केंद्र हे अतिशय महत्वपूर्ण असून या ठिकाणी  या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी शासन-प्रशासनाने  दखल घेणे आवश्यक असल्याचा सूर नागरीकातून निघत आहे.

Post a Comment

0 Comments