google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 “माझ्यावर झालेली शाईफेक हा भ्याडपणा, हिंमत असेल तर…”, शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

Breaking News

“माझ्यावर झालेली शाईफेक हा भ्याडपणा, हिंमत असेल तर…”, शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

 “माझ्यावर झालेली शाईफेक हा भ्याडपणा, हिंमत असेल तर…”, शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. 

दरम्यान, आज त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. माझ्यावर झालेली शाईफेक हा भ्याडपणा असून हिंमत असेल तर समोर या, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

“मी चळवळीतला माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. अशा प्रकारे पराचा कावळा करणं, योग्य नाही. मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. मी त्यावर तीनवेळा स्पष्टीकरणही दिलं आहे. तरीही अशाप्रकारे भ्याडपणे माझ्यावर शाईफेक करण्यात आली आहे. मी माझं पोलीस संरक्षण काढून कार्यक्रमाला जायला तयार आहे, हिंमत असेल तर समोर या”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

“आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सुट दिली तर काय होईल? पण ही आमचा संस्कृती नाही. शब्दाला शब्दानेही उत्तरं देता येतात. माझ्या विधानानंतर मी लगेच स्पष्टीकरण दिले होते. मुळात एका गिरणी कामगाराचा मुलगा या पदापर्यंत पोहोचणे, हे सरंजामशाही वृत्तीच्या लोकांना झेपत नाही. त्यामुळे असे भ्याड हल्ले सुरू आहेत”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

Post a Comment

0 Comments