महत्वाची बातमी ! सोलापूर जवळ रेल्वेवर जबरी दरोडा; दागिन्यांसह रक्कम लुटली
भावनगर-काकीनाडा एक्स्प्रे्समध्ये हा दरोडा टाकण्यात आला आहे. दरोडेखोरांनी महिला प्रवाशांचे सोने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल लुटला. आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांकडून चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत रेल्वे गाडीवर जबरी दरोडा पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत दरोडेखोरांनी महिला प्रवाशांचे सोने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल लुटला. ही घटना मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ स्टेशन जवळ घडली असल्याची माहिती आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आली.
भावनगर-काकीनाडा एक्स्प्रे्समध्ये हा दरोडा टाकण्यात आला आहे. दरोडेखोरांनी महिला प्रवाशांचे सोने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल लुटला. आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांकडून चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भावनगर-काकीनाडा (क्रमांक-१७२२२) ही एक्स्प्रेस १५ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास निघाली. दौंडवरून थेट सोलापूरला थांबा असल्याने अनेक प्रवासी आराम करत होते. सोलापूर हद्दीतील मलिकपेठ स्टेशन जवळ येताच एक्स्प्रे्सचा वेग कमी झाला. दरोडेखोरांनी ट्रेक डाऊन केल्यामुळे एक्स्प्रेसचा वेग कमी झाला.
एक्स्प्रेसमधील एस-६,एस-७ या डब्यात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला होता. झोपी गेलेल्या प्रवाशांना दमदाटी करत त्यांच्या अंगावरील दागिने ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
गर्दीत दरोडेखोरांनी गौसिया बेगम (वय ६० वर्ष) यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे दागिने आणि ७ हजार रुपयांची रोकड, श्रीमती राधा (वय ४२ वर्ष) या महिला प्रवाशाच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याचे दागिने, श्रीमती गीता यांच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे दागिने आणि ७ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम लुटली आहे.
पोलिसांनी केलेल्या पाहणीनुसार अज्ञात दरोडेखोरांनी एक्स्प्रेस ट्रेन सावकाश होताच दरोडा घातला. या घटनेमुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
ही घटना घडताच ट्रेनमध्ये मोठी खळबळ उडाली होती. घटनेनंतर प्रवाशांनी ताबडतोब टीटी खुशीराम मीना यांच्याकडे तक्रार दाखल केली असून सोलापूर स्थानकावर आल्यावर आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
0 Comments