सांगोला वाकी शिवणे येथे ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू; घातपाताचा संशय...
धाराशिव साखर कारखाना लि. संचलित सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या वाहन तळावर ऊस वाहतुक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी समोर आला. अमोल हणमंत लवटे (२५) रा. लोटेवाडी असे मृत्यू चालकाचे नाव आहे. हा अपघात की घातपात असा प्रश्न निर्माण झाल्याने नातेवाईकांनी मृतदेह थेटकारखान्याच्या आवारात ठेऊन आक्रोश केला. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करीत सखोल चौकशीचे अश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
लोटेवाडी येथील ट्रॅक्टर चालक अमोल लवटे हा सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास धाराशिव साखर युनिट -४ सांगोला सह सा. कारखान्याच्या यार्डात बेशुद्ध अवस्थेत पडला होता. हीघटना पाहून कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी
त्यास उपचाराकरता महुद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यास सांगोला ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी राजुलवार यांनी कारखाना स्थळी पोलीस फौजफाट्यासह धाव घेऊनजमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. उपस्थितांनी अमोलच्या मृत्यूची चौकशी मागणी करून कुटुंबाला आर्थिक मदत करावी म्हणून विषय लावून धरला. अखेर धनंजय काळे, डीएस सावंत, संजय मेटकरी आदींनी मध्यस्थी केल्याने कारखाना प्रशासनाकडून आर्थिक मदतीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर वादावर पडदा पडला.
चौकट
कारखाना कर्मचाऱ्यांनी रूग्णालयात दाखल केले माणुसकीच्या नात्याने कारखाना परिसरात आढळलेला जखमी अवस्थेत •असणाऱ्या अमोल लवटे याला उपचारासाठी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. दुर्दैवाने उपचारादरम्यान अमोल लवटे यांचा मृत्यू झाला. अमोल लवटे याच्या मृत्यूशी कारखाना प्रशासनाचा कसलाही संबंध नाही. यामधे कारखान्याचे कोणीही दोषी असेल तर त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही.
- अभिजीत पाटील, चेअरमन, धाराशिव उद्योग समूह.


0 Comments