google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ३१ डिसेंबरला तगडा पोलिस बंदोबस्त! २.२५ लाख मद्यपींनी घेतला परवाना; गावात पोलिस पाटलांचा वॉच

Breaking News

३१ डिसेंबरला तगडा पोलिस बंदोबस्त! २.२५ लाख मद्यपींनी घेतला परवाना; गावात पोलिस पाटलांचा वॉच

 ३१ डिसेंबरला तगडा पोलिस बंदोबस्त! २.२५ लाख मद्यपींनी घेतला परवाना; गावात पोलिस पाटलांचा वॉच

नववर्षाच्या स्वागताची तयारी आता सुरु असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून एक लाख देशी व सव्वालाख विदेशी दारुचे एकदिवसीय परवाने वितरीत झाले आहेत.

हॉटेल, धाबे किंवा अन्य कोठेही विनापरवाना मद्यपान किंवा मद्यविक्री करू नये, नियमांचे उल्लंघन करून नववर्षाचे स्वागत करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी ग्रामीण व शहर पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण १५ पेक्षा अधिक पथके नेमली आहेत.

कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच नववर्षाचे स्वागत धुमधडाक्यात होणार आहे. त्या दिवशी हॉटेल, धाबे, रेस्टॉरंटवर ग्राहकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी बार व रेस्टॉरंट पहाटे एक ते पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

 पण, हॉटेल किंवा धाब्यांवर नवीन वर्षाची पार्टी करायची असल्यास २० हजाराचे शुल्क भरून त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वनडे क्लब लायसन्स घेणे बंधनकारक आहे.

 विनापरवाना पार्टी केल्यास पार्टीतील सहभागी व्यक्तींसह हॉटेल मालकाविरूद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. मद्यपान करणाऱ्यांना दोन ते पाच हजारांचा दंड तर हॉटेल मालकास २५ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. 

३१ डिसेंबरला मोठ्या प्रमाणावर मद्यविक्री होते. या पार्श्वभूमीवर हातभट्टी दारु निर्मितीचे तांडे, वाहनांमधून अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या विदेशी, देशी दारू केली जाते. त्यावर विशेष करून राज्य उत्पादन शुल्क विभागाचा वॉच असणार आहे. 

परवाना नसल्यास थेट गुन्हा

हॉटेल्सला एक दिवसाच्या पार्टीसाठी २० हजार रुपये तर व्यक्तींनी एक वर्षासाठी १०० रुपये, आजीवन परवान्यासाठी एक हजाराचे शुल्क भरुन परवाना घ्यावा. विनापरवाना तसे प्रकार आढळल्यास १८००२३३९९९९ व ८४२२००११३३ या टोल फ्रि क्रमांकावर कोणीही तक्रार करू शकतो.

- नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

फटाके उडवण्यासाठी रात्री १० ते १२ पर्यंतची वेळ

नववर्षाच्या स्वागतावेळी रात्री दहा ते १२ या वेळेतच फटाके उडविण्यास परवानगी राहील. मद्यपान करून कोणीही वाहन चालवू नये. त्यांच्या तपासणीसाठी ४० ब्रिथ ॲनालायझर मशीन पोलिसांना दिल्या आहेत. सात पोलिस ठाण्याअंतर्गत ठिकठिकाणी नाकाबंदी असेल. अवैध व्यवसायांवर गुन्हे शाखेचा वॉच असेल.

- डॉ. राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

मद्यपान करून कोणीही वाहन चालवू नये

३१ डिसेंबर रोजी पहाटेपर्यंत २५ पोलिस ठाण्याअंतर्गत नाकाबंदी राहील. ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या कारवाईवर भर दिला जाईल. २५ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांना ३५ ब्रिथ ॲनालायझर मशीन दिल्या आहेत. मद्यपान करून कोणीही वाहन चालवू नये. नियमांचे पालन करून सर्वांनी नववर्षाचे स्वागत करावे.

- शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

पोलिस पाटलांनी त्यांच्या हद्दीत ठेवावा वॉच

जिल्ह्यातील पोलिस पाटलांनी ३१ डिसेंबर रोजी त्यांच्या हद्दीतील अवैध व्यवसायांवर लक्ष ठेवावे. सतत पोलिसांच्या संपर्कात राहावे. विनापरवाना मद्यविक्री, कुठे भांडण-तंटे झाल्यास व अवैध दारू वाहतूक होत असल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी,

 अशा सूचना पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केल्या आहेत. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. सर्वांनी नियमांचे पालन करून नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments