google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वाढदिवशीच मामाने भाच्याला भोसकून मारलं, धक्कादायक कारण

Breaking News

वाढदिवशीच मामाने भाच्याला भोसकून मारलं, धक्कादायक कारण

 वाढदिवशीच मामाने भाच्याला भोसकून मारलं, धक्कादायक कारण

औरंगाबादमध्ये गुन्हेगारीच्या प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी भर चौकात खून केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एक धक्कादाय घटना समोर आली आहे.

वाढदिवसावरून मामा आणि भाचे यांच्यात मोठा वाद झाल्याने मामाने चक्क चाकुने भोसकले आहे. ही घटना औरंगाबाद शहरातील किराडपुरात भागात घडली आहे. सय्यद साजिद माजीद असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवस साजरा करताना झालेल्या धक्काबुक्कीतून मामाने भाच्याला चाकूने भोसकल्याची घटना औरंगाबाद शहरातील किराडपुरा भागात उघडकीस आली आहे. 

सय्यद साजिद सय्यद माजिद असे मृताचे नाव आहे‌. तर याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अझहर पठाण आणि अरबाज पठाण या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

Post a Comment

0 Comments