खरे बांधकाम कामगार उपाशी आणि बोगस काम बांधकाम कामगार तुपाशी ; विष्णू करमपुरी (महाराज)
सोलापूर दिनांक :- १०/१२/२०२२ :- सोलापुरात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय मार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी करताना मोठ्या प्रमाणात बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी केलेली आहे. याबाबत त्याची चौकशी व्हावी. व बोगस कामगारांनी मिळत असलेल्या आर्थिक लाभांचा पूर्णपणे चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
अशा मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जनहित संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन चालू असून त्याचा आज सहाव्या दिवशी शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी धरणे आंदोलन सहभागी होऊन सक्रिय पाठिंबा देण्याचा जाहीर केले आहे.
यावेळी बोलताना कारमपुरी (महाराज) म्हणाले की, सोलापुरात जे बांधकाम कामगार आहेत. त्यांना शासनाच्या कुठल्याही आर्थिक, कायदेशीर फायदा मिळत नाही. परंतु बोगस कामगारांना सर्व फायदे मिळतात. यास कारणीभूत म्हणजे सहाय्यक कामगार स्वतः व त्यांच्या कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी आहेत. यात बाहेरील दलाल लोकांचा सहभाग आहे.
यापूर्वी सहाय्यक कामगार आयुक्त श्री. येलगुंडे अशाच भ्रष्टाचारामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले. परंतु त्याची दाख कुठेही या कार्यालयात दिसून येत नाही. प्रत्येक बांधकाम कामगाराला पैसे घेतल्याशिवाय किंवा दलाला मध्यस्थी केल्याशिवाय त्यांची नोंदणी केली जात नाही. म्हणूनच खरा कामगार उपाशी आणि बोगस कामगार तुपाशी अशी अवस्था आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचे पाठिंबा देण्यासाठी बसलेल्या उपोषणाच्या वेळी विष्णु कारामपुरी (महाराज), दीपक गवळी, गणेश म्हंता, गुरुनाथ कोळी, सोहेल शेख, देवकर काका, बाबू दोरकर, नागार्जुन कुसुरकर, गणेश बोड्डू, सुदरोदास देवकर, राजकुमार राठोड, बाबुराव सोनवणे, अतिश कांबळे, योगिराज मस्के, आदर्श कांबळे यांच्यासह कामगार पुढारी बांधकाम कामगार आंदोलक उपस्थित होते.


0 Comments