google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूक मतदान “निकाल २० डिसें.२०२२ रोजी..

Breaking News

राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूक मतदान “निकाल २० डिसें.२०२२ रोजी..

राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूक मतदान “निकाल २० डिसें.२०२२ रोजी.. 

सोलापूर :-आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचे मतदान सुरू झाले आहे.यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (रविवार) मतदान होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यंदा थेट नागरिकाधून सरपंचपदाची निवडणूक असल्याने चुरस आणखी वाढली आहे.सोलापूर जिल्ह्यातील १८८ पैकी १३ ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, १७५ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. त्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील १७५ गावांमधील ६५२ बूथवर रविवारी मतदान होणार आहे. त्यासाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड असा बंदोबस्त असणार आहे. दारू विक्रेत्यांसह सराईत गुन्हेगार व इतरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक शांततेत पार पडावी, यादृष्टीने पोलिसांना आदेश दिले आहेत.- हिंमत जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

निवडणूक होत असलेल्या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतीची आकडेवारी…

अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, 

कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.

सोलापूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सात पोलिस उपअधीक्षक, १३ पोलिस निरीक्षक, ५४ सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, ६४५ पोलिस अंमलदार, एक हजार होमगार्ड, १०० जणांची एक राज्य राखीव पोलिस बलाची तुकडी, दंगा नियंत्रण पथक व जलद प्रतिसाद पथकाची प्रत्येकी एक तुकडी या निवडणुकीसाठी नेमली आहे.

.तर पोलिस पाटलांवर कारवाई

प्राप्त माहीत नुसार गावातील ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडावी, निरपेक्ष पद्धतीने निवडणूक व्हावी, यासाठी पोलिस पाटलांना सक्त सूचना केल्या आहेत. त्यांनी निवडणुकीवेळी पोलिसांना मदत करणे अपेक्षित आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील कोणत्या गटाची बाजू घेऊन प्रचार किंवा अन्य काही कृत्य केल्यास, त्यांच्यावर देखील कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी दिला आहे.

आता या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कोण कोणाच्या विरोधात बाजी मारणार हे २० डिसेंबरला पाहायला मिळणार आहे.

 तर ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार धडाक्यात झाला पण या निवडणुकीत विजयी झाल्यावरही मिरवणुकीचा जल्लोष करता येणार नाही. विजयी मिरवणुकीवर जिल्हाधिकारी यांनीच बंदी घातली असून तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments