google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मुख्याध्यापकाची आत्महत्या ३ पानाची सुसाईड नोट.. २३ जणांवर गुन्हा

Breaking News

मुख्याध्यापकाची आत्महत्या ३ पानाची सुसाईड नोट.. २३ जणांवर गुन्हा

 मुख्याध्यापकाची आत्महत्या ३ पानाची सुसाईड नोट.. २३ जणांवर गुन्हा

शाळेसमोर मुख्याध्यापकाची आत्महत्या

बीड - 5 डिसेंम्बरला जिल्हा परिषद शाळेसमोरील हॉटेलमध्ये मुख्याध्यापक 40 वर्षीय भारत सर्जेराव पाळवदे यांनी गळफास घेत आत्महत्या केली होती.

पोलिसांनी घटनेची तात्काळ दखल घेत पंचनामा केला, मृतदेहाजवळ 3 पानांची सुसाईड नोट आढळली, त्या सुसाईड नोटमुळे पाळवदे यांच्या मृत्यूचे कारण लक्षात आले. पोलिसांनी या आत्महत्या प्रकरणी तब्बल 23 जणांवर गुन्हे दाखल केले आहे.

भारत हे मुख्याध्यापक होते त्यासोबत ऊस तोडणी कामगारांचे मुकादम सुद्धा, ऊस तोडणीसाठी कारखान्यातून पैसे उचलून ते मजुर देण्याचं काम ते होते, मात्र काही दिवस मजूर हे कारखान्यात गेले नसल्याने त्याचा भार पाळवदे यांच्यावर आला होता. 

यामुळे त्यांच्या 30 ते 35 लाख रुपये कर्जाचा डोंगर उभा राहिला होता, पैसे परत मिळावे यासाठी खासजी सावकारांनी त्यांच्यामागे तगादा लावला, काहींनी शिवीगाळ सुद्धा केली, या त्रासाला कंटाळून ऑगस्ट महिन्यात ते घरून निघून गेले होते.

ते बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी केज पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी कुटुंबियांच्या तक्रारीनंतर भारत चा शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र 5 डिसेंम्बरला शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिल्हा परिषद शाळेसमोरील हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

पाळवदे यांची हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित झाला होता, मात्र मृतदेहाजवळ मिळालेल्या 3 पानांच्या सुसाईड नोटमुळे मृत्यूचे कारण स्पष्ट झाले.

पाळवदे हे दिव्यांग होते, त्यानुसार या अंतर्गत येणाऱ्या कायद्यांव्ये पोलिसांनी 23 जणांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments