50 व्या वर्षी आईचं लावलं दुसरं लग्न , लेकीच होतंय कौतुक
आपल्या मुलीला किंवा मुलाला हवा तो नवरा मिळावा, तिला सुखी राहता येईल असे घर मिळावे, अशी प्रत्येक पालकाची मनापासून इच्छा असते.
सासरच्या मंडळींनी तिचा आदर केला पाहिजे, तिच्यावर प्रेम केले पाहिजे, नवऱ्याने तिच्यावर प्रेम केले पाहिजे. यासाठी पालक आतुरतेने आपल्या मुलीसाठी तसे स्थळ शोधतात.योग्य वर मिळाल्यानंतर तिचे लग्न लावतात, परंतु आजकाल अशीच एक गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
आई-वडिल मुलीला लग्न करून सासरी पाठवतात. पण मेघालयातील एका मुलीनं आपल्या आईसाठी असं पाऊल उचललं आहे, ज्याचं आता सर्वांकडून कौतुक होत आहे.
आता या आई आणि मुलीची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका मुलीने आपल्या 50 वर्षांच्या आईचे लग्न लावून दिलंय. मेघालयातील शिलाँग येथे राहणाऱ्या देबर्ती चक्रवर्ती या महिलेने तिच्या आईने दुसरं लग्न लावून दिलं.ही एक अतिशय उत्कृष्ट बाब असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घ्या.
0 Comments