सोशल मीडियावरील संदेश आणि अफवांवर विश्वास ठेवू नका मा. जिल्हाधिकारी यांचा आदेश येई पर्यंत सांगोला जनावरांचा आठवडा बाजार बंदचं राहणार...
सांगोला / जनावरांमध्ये लम्पी स्कीन या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भरणारा जनावरांचा आठवडा बाजार बंद आहे. परंतु बाजार सुरूहोणार अशा चर्चा सुरू आहेत. मात्र मा. जिल्हाधिकारी यांचा आदेश येईपर्यंत जनावरांचा आठवडा बाजार बंदचं राहणार आहे. अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक प्रकाश नालवार यांनी दिली आहे.लम्पी या आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत आहे.
आजुबाजु तालुका आणि जिल्ह्यातील जनावरांचा बाजार सुरू झाला आहे अशी माहिती मिळत असून आपल्या सांगोला तालुक्यातील जनावरांचा आठवडा बाजार सुरू करण्याबाबत वरीष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. याबाबत आदेश प्राप्त होताच तत्काळ बाजार पूर्ववत सुरू करण्यात येईल.
मा. प्रकाश नालवार, प्रशासक, बाजार समिती सांगोला
जिल्ह्यात आणि आता तालुक्यात गाई व म्हैसवर्गीय जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाले आहेत. अनेक जनावरांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. परिणामी जनावरांमध्ये होणारा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भरणारा सर्व जनावरांचे बाजारभरविणेस मनाई केली आहे.
तसेच शेतकरी गो पालक यांनी बाहेरच्या जिल्ह्यातून पशुधन खरेदी करणे व पशुधनाची वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. म्हणून सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणारां जनावरांचा बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. असेही सांगण्यात आले आहे.


0 Comments