google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दादा भुसेंनी पोलिसांसमोर युवकाला फटकावत शिव्या दिल्या, आता…”, जितेंद्र आव्हाडांकडून व्हिडीओ ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना सवाल

Breaking News

दादा भुसेंनी पोलिसांसमोर युवकाला फटकावत शिव्या दिल्या, आता…”, जितेंद्र आव्हाडांकडून व्हिडीओ ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना सवाल

दादा भुसेंनी पोलिसांसमोर युवकाला फटकावत शिव्या दिल्या,

आता…”, जितेंद्र आव्हाडांकडून व्हिडीओ ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना सवाल

शिंदे गट आणि भाजपामधील वाचाळवीर आमदारांमुळे सरकारची डोकेदुखी वाढली होती. यावरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरलं होतं. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत दादा भुसे पोलिसांसमोर एका युवकाला मारहाण करत आहे. 

माझा नग्न फोटो टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलंत. आता पोलिसांसमोर युवकाला फटकावणाऱ्या मंत्री भुसेंवर आपण कोणती कारवाई करणार? त्यांच्यावर कोणता गुन्हा लावणार, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

अनंत करमुसे प्रकरण आणि एक महिलेने विनयभंगाचा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यातच दादा भुसे यांचा व्हिडीओ समोर आल्याने मुख्यमंत्री आता कोणती कारवाई करणार, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “मंत्री दादा भुसे एका युवकाला पोलिसांसमोर फटकावतात. शिव्या देतात… मुख्यमंत्री साहेब कुठला गुन्हा पोलीस दाखल करणार? माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलंत. सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौज उभी केली. सर्वोच्च न्यायालयात रात्री त्या विकृताबरोबर आपली बैठक झाली. आता बोला.”

Post a Comment

0 Comments