जुजारपूर मार्गे मिरज हायवेवरून राजुरी येथील अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू
सांगोला : आत्याच्या नवीन ट्रॅक्टरची पूजा करून गावाकडे निघालेल्या माय- लेकाच्या दुचाकीला राजुरी (ता. सांगोला) येथे अपघात झाला.
या अपघातात जखमी मंगल कोंडिबा कुटे (वय ५०) यांचा गुरुवार, दि. २९ डिसेंबर रोजी सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मुलगा केराप्पा कुटे, नातू राहुल कुटे यांच्यावर सांगली रुग्णालयात उपचार सुरू असून, दोघेही शुध्दीवर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजुरी येथील केराप्पा कुटे (वय ३२), आई मंगल कुटे (वय ५०) व नातू राहुल कुटे (वय ४) हे बुधवारी दुचाकीवरून (क्र. एमएच ०३ वाय ४१३४) बुध्देहाळ (ता. सांगोला) येथील केराप्पा कुठे यांच्या आत्याने घेतलेल्यानवीन ट्रॅक्टरच्या पूजेसाठी आहेर घेऊन गेले होते. ट्रॅक्टरची पूजा केल्यानंतर त्यांचा पाहुणचार घेऊन तिघेही दुचाकीवरून जुजारपूर मार्गे मिरज हायवेवरून राजुरी गावाकडे परत निघाले होते.
त्यावेळी पाचेगाव खु फाट्याकडून जावेद मगन शेख ह दुचाकीवरून (क्र. एमएच ४५ एक्ट ६९१५) हातीदकडे भरधाव वेगाने विरुद्ध बाजूने येऊन केराप्पा कु यांच्या दुचाकीला समोरून धडकला हा अपघात बुधवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घडला होता
अपघातात जावेद शेख जागीच ठा झाला. तर केराप्पा कुटे, मंगल कुटे व राहुल कुटे हे जखमी झाले होते तिघांवर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतान उपचारादरम्यान मंगल कुटे यांचा मृत्य झाला.


0 Comments