लोटेवाडी गावचे उपसरपंच दादासाहेब सावंत एका मुलावर कुटुंब नियोजन नसबंदी करून गावासमोर नवीन आदर्श ठेवला
दिनांक 9 /12/ 2022 रोजी करकंब तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मध्ये नसबंदी शस्त्रक्रिया केली प्रथम नसबंदीचा हा प्रस्ताव त्याचे मित्र अॅड शंकर सरगर यांच्या समोर मांडला असता त्यानी त्या गोष्टीची कौतुक केले
व या नसबंदीसाठी प्रोत्साहन दिले आणि सांगितले की हा आदर्श आपल्याला तालुका पुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्राला घालून द्यायचा आहे त्यानंतर आरोग्य सेवक राहुल देवकर यांच्याकडे कुटुंब नियोजन साठी नोंदणी केली
व त्यानंतर ती बातमी त्याच्या वरिष्ठ सांगोला पंचायत आरोग्यविस्तार अधिकारी मिलिंद सावंत व महुद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी 48 तासात नसबंदीसाठी करकंब तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी घेऊन गेले
या शास्त्रक्रियेसाठी ग्रामीण रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर तुषार सरवदे साहेब सर्जन त्यांच्याबरोबर डॉक्टर होवाळ साहेब सर्जन तसेच महुड आरोग्य प्राथमिक केंद्राचे पोतदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नसबंदी करण्यात आली या नसबंदीचे सर्व स्तरातुन कौतुक केले जात आहे तसेच सावंत परिवार बनसोडे परिवार वाघमारे परिवार यांच्याकडून विशेष अभिनंदन करण्यात आले आहे


0 Comments