google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गाडीसह बैल तलावात घुसले; आजोबा व नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू

Breaking News

गाडीसह बैल तलावात घुसले; आजोबा व नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू

 गाडीसह बैल तलावात घुसले; आजोबा व नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू 

धारुर — बैलांना पाणी पाजण्यासाठी गाडी बैलांसह तलावावर जात असताना अचानक रान डुकरांनी हल्ला केला. यामुळे गाडीला असलेले बैल उधळले व ते थेट तलावात घुसले त्यामुळे गाडीत बसलेले आजोबा व नातू यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कासारी ( बो. ) येथे गुरुवार दि.22 डिसेंबर रोजी दुपारी घडली आहे. दुसरा नातू तलावाच्या काठावर पडल्याने तो जखमी आहे.


सय्यद कबीर बाशुमियां वय 65 वर्ष, सय्यद अमजद अखिल वय 12 वर्ष दोघे रा. कासारी बो. असे मयत आजोबा व नातवाचे नाव आहे तर जखमी नातवाचे सय्यद अतिख वय 15 वर्ष असे नाव आहे. आजोबा व दोन नातू असे तिघे बैलगाडीतून चालले होते. 

यावेळी गावाच्या जवळ असलेल्या तलावावर बैलांना पाणी पिण्यासाठी घेऊन गेले तलावाच्या काठावर पाणी पिताना बैलांवर अचानक रानडुक्करांनी हल्ला केल्याने बैल भीले अन् गाडीसह उधळत तलावात घुसले.

 यावेळी गाडीत बसलेले आजोबा आणि नातूही पाण्यात ओढले गेले. यामुळे आजोबा सय्यद कबीर आणि एक नातू अमजद या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अतिख अलिकडेच गाडीतून फेकला गेल्याने तो पडला परंतु तोही जखमी असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

 घटना समजताच गावातील नागरिकांनी दोघांना पाण्यातून बाहेर काढले परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी धारुर येथील सरकारी दवाखान्यात आणण्यात आले आहे. जखमीलाही उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून धारुर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments