१७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी केला सामूहिक अत्याचार; अन एका महिलेने नग्न…
बीड : शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या मजुराच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे आली. आई- वडील कामाला गेल्याची संधी साधत घरातून फरफटत ओढत शेजारील उसाच्या शेतामध्ये नेऊन तीन नराधम तरुणांनी आळीपाळीने बलात्कार केला.
माहितीनुसार, मंठा तालुक्यातील एक कुटुंब दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलुरा गावातील शेतकऱ्याच्या शेतावर कामाला आहे. शुक्रवारी सकाळी आई– वडील शेतात कामाला गेल्याने त्यांची १७ वर्षीय पीडित मुलगी घरी एकटीच होती.
ही संधी साधत आरोपी बाळू उर्फ महादेव सुधाकर फपाळने पीडित मुलीला शेजारील उसाच्या फडात फरफटत ओढत नेले. यानंतर तिथे तिच्यावर विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ, अक्षय अर्जुन फपाळ या तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला. या दरम्यान एका महिलेने सामुहिक अत्याचार होत असताना पीडित मुलीचे नग्न फोटो काढले.
दरम्यान, याप्रकरणी अल्पवयीन पीडित मुलीच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिस ठाण्यात एका महिलेसह महादेव फपाळ, विजय फपाळ, अमोल फपाळ आणि अक्षय फपाळ यांच्यावर बाललैंगिक अत्याचार ॲट्रॉसिटीनुसार गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तसेच, या तीन नराधमांना तात्काळ जेरबंद केले आहे.
0 Comments