google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वर्ल्ड चॅम्पियनशिप विनर महिला बाॅडीबिल्डर झळकणार चित्रपटात

Breaking News

वर्ल्ड चॅम्पियनशिप विनर महिला बाॅडीबिल्डर झळकणार चित्रपटात

 वर्ल्ड चॅम्पियनशिप विनर महिला बाॅडीबिल्डर झळकणार चित्रपटात

मुंबई (प्रतिनिधी)- बॉडी बिल्डिंगमध्ये पुरुषांचं वर्चस्व मानलं जात होतं, पण राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यात राहणाऱ्या प्रिया सिंहने हे मोडित काढत काही वर्षांपूर्वी बॉडी बिल्डिंग क्षेत्रात एंट्री केली. प्रिया सिंग राजस्थानची पहिली बॉडी बिल्डर आहे, जिने वर्ल्ड बिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आहे. प्रियाने थायलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं आहे. आता ती लवकरच चित्रपटात झळकणार आहे.

थायलंड येथील पटाया येथे १७ आणि १८ डिसेंबर २०२२ रोजी ३९ वी आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा होती. या स्पर्धेत राजस्थानची पहिली महिला बॉडीबिल्डर प्रिया सिंगने सहभाग घेतला होता. 

या स्पर्धेत तिने सुवर्णपदक आणि प्रो. कार्ड जिंकलं आहे. प्रिया सिंह राजस्थानची पहिली बॉडी बिल्डर आहे, जिने वर्ल्ड बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आणि सुवर्ण पदक जिंकले. विशेष म्हणजे प्रिया विवाहित असून तिला दोन मूल आहेत.

 बॉडी बिल्डिंगमुळेच मागील काही दिवसांपूर्वी जयपूरमध्ये झालेल्या एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये प्रिया सिंहने पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका पार पाडली आहे. विशेष म्हणजे प्रिया बॉडी बिल्डिंग प्रोडक्ट बनवणाऱ्या एका कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर आहे. तसेच प्रिया एका जिममध्ये ट्रेनरचे काम करत आहे.

प्रिया सिंह घर आणि जीम अशा दोन्ही गोष्टी सांभाळते. यासाठी तिला कुटु़ंबाचीही मदत होत असते. प्रियाने राज्यस्तरावरही सुवर्णपदके मिळवली आहेत. प्रियाने केलेल्या कामगिरीबद्दल तिचे सर्व स्तरातुन काैतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments