google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीतून सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्ते दुरुस्तीसाठी ८ कोटी मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील.

Breaking News

नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीतून सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्ते दुरुस्तीसाठी ८ कोटी मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील.

नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीतून सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्ते दुरुस्तीसाठी ८ कोटी मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील.

सध्या नागपूर येथे सुरू असलेले हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यातून सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्ते दुरुस्तीच्या चार कामांसाठी ८ कोटी रुपये नव्याने मंजूर झाल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली. 

१) नरळेवाडी वाकी रस्ता दुरुस्तीसाठी १ कोटी 

२) तांदूळवाडी महीम रस्ता दुरुस्तीसाठी १ कोटी 

३) धायटी हलदहिवडी गायगव्हाण रस्ता दुरुस्तीसाठी ३ कोटी  व ४) चोपडी हातीद जुजारपूर रस्ता दुरुस्तीसाठी ३ कोटी अशा चार कामांसाठी एकूण ८ कोटी रूपये नव्याने मंजूर झाले असून लवकरच या कामांचे अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कामांना सुरुवात केली जाईल अशी माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. 

मार्च २०२२ पासून आज पर्यंत विशेष रस्ता दुरुस्ती व बजेट मधील रस्ता दुरुस्तींच्या कामांसाठी एकूण ११८ कोटी रुपये मंजूर झाले असून एका वर्षामध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना मिळालेला हा सर्वाधिक निधी असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments