सांगोला -शिवणेत एका जागेवर तडजोड न झाल्याने सर्वच जागांसाठी निवडणूक ...
फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला अन् सदस्यांसाठी अडले
सांगोला शिवणे (ता. सांगोला) ग्रामपंचायती- च्या ५० वर्षांच्या राजकीय घडामोडीत यंदा प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना व शेकापकडून सरपंचपदासाठी अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर एकमत झाले. परंतु केवळ सदस्य पदाच्या एका जागेवर तडजोड न झाल्यामुळे दोन्हीही पाठ्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले आहे. सरपंचपदासाठी ग्रामविकास आघाडीकडून मुक्ताई उद्योग समूहाचे आघाडीकडून खासगी पशुवैद्यक मारुती घोगरे यांच्यात दुरंगी लढत होत आहे.
उद्योगपती दादासाहेब घाडगे, तर शेकापच्या शेतकरी विकास दरम्यान, दोन्ही आघाड्यांकडून गाव, वाडी-वस्ती 'होम टू होम' मतदारांच्या भेटीगाठी घेऊन हायजॅक प्रचार सुरू असला, तरी गावातील वातावरण अत्यंत शांततेचे असल्याचे दिसून आले. शिवणे ग्रामपंचायतीच्या
मुलगा अन् आईही रिंगणात
शिवणे ग्रामपंचायतीत मुलगा दादासाहेब जनार्दन घाडगे हे सरपंचपदासाठी तर त्यांची आई माजी सरपंच कुसुमताई जनार्दन घाडगे हे सदस्य पदासाठी निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे आई व मुलाच्या लढतीकडे सर्वांचच लक्ष लागले आहे...
स्थापनेपासून सन १९५८ ते २००७ पर्यंत ग्रामपंचायतीवर शेकापचे वर्चस्व राहिले आहे. सन २००७ मध्ये सत्तांतर होऊन आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या गटाचे २०१७ पर्यंत दोन वेळा वर्चस्व राहिले. त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जनतेतून शेकापकडे सरपंचपद गेले. तर बहुमत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते त्यामुळे सरपंच शेकापचा, त उपसरपंच आघाडीकडे होते.
दरम्यान सरपंच पदासाठी राष्ट्रवादी, शिवसेन ग्रामविकास आघाडीकडून उद्योगपत दादासाहेब घाडगे तर शेकापक्षाकडू- मारुती घोगरे दोघेजण निवडणूक लढवीत आहेत. सरपंच पदासह सदस्य पदाच्या ११ जागेसाठी निवडणूक चुरशीची व रंगतदार होणार आहे.
0 Comments