सांगोला तहसील कार्यालय आवारातील दुचाकी पार्किंग मुळे अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या
इच्छुकांची गैरसोय सांगोला : इतर ठिकाणी हलविण्याची मागणी
सांगोला : चोरून वाळू वाहतूक करताना पकडलेली वाहने सांगोला तहसील आवारात उभी केल्याने व दुचाकीच्या पार्किंगमध्ये झाकोळली आहेत.
त्यामुळे सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांची सांगोला तहसील कार्यालयात मोठी गैरसोय होताना दिसत आहे. तहसीलदारांनी लक्ष घालून संबंधित वाहने बाजूला काढून तसेच दुचाकी पार्किग इतर ठिकाणी हलवून होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी
इच्छुक उमेदवारांमधून होत आहे. सांगोला तालुक्यातील चिंचोली, शिवणे, बलवडी, चिणके, अनकढाळ व पाचेगाव खुर्द या सहा ग्रामपंचायतींच्यानिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
सहा ग्रामपंचायतींच्या ६२ जागांसाठी २८ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अभिजित पाटील यांनी तहसील कार्यालयाच्या उत्तरेकडील बाजूस उमेदवारांचे सांगोला नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यासाठी सहा ठिकाणी टेबलवर सोय केली आहे;
परंतु जेथे अर्ज स्वीकारण्याची सोय केली आहे त्यासमोर चोरून वाळू वाहतूककरताना पकडलेली वाहने उभी केल्यामुळे कार्यालय झाकोळले आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होऊ लागली आहे.
तेथेच समोर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दुचाकी पार्किंगमुळे उमेदवारांना येता जाताना अडथळ्यामुळे गैरसोयीचे होत आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे तहसीलदार अभिजित पाटील यांनी तेथील वाहने व पार्किंग इतर ठिकाणी हलवून अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय दूर करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
0 Comments