google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "नविन भारताचे 'राष्ट्रपिता" म्हणून उल्लेख तर गांधी "जून्या 'भारताचे राष्ट्रपिता" अमृता फडणवीस यांनी एक वादग्रस्त वक्तव्य

Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "नविन भारताचे 'राष्ट्रपिता" म्हणून उल्लेख तर गांधी "जून्या 'भारताचे राष्ट्रपिता" अमृता फडणवीस यांनी एक वादग्रस्त वक्तव्य

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "नविन भारताचे 'राष्ट्रपिता" म्हणून उल्लेख

तर गांधी "जून्या 'भारताचे राष्ट्रपिता" अमृता फडणवीस यांनी एक वादग्रस्त वक्तव्य

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचे वादग्रस्त वक्तव्य करून उडवली खळबळ

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख नवीन भारताचे राष्ट्रपिता तर महात्मा गांधी हे जुन्या भारताचे राष्ट्रपिता आहेत असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे

मंगळवारी नागपूर येथे अभिरुप न्यायालय पार पडले यावेळी अमृता फडणवीस यांनी संघात माझी तक्रार केल्याचं म्हटलं. त्या म्हणाल्या की, " मला राजकारण आवडत नाही. मला त्यात रसही नाही. त्यामुळे मी खूप कमी राजकीय गोष्टींवर मत देत असते. माझ्यासाठी आणि देवेंद्रजींसाठी हे चांगल फायद्याचं आहे. आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत." असे अमृता माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

"मी आधी फार शांत आणि लाजरी होते. पण आता मी माझी मतं ठामपणे मांडते. मी खूप जास्त बोलते असे संघात सांगण्यात आले होते. मात्र माझ्या बोलण्याचा फायदा लोक दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून घेत आहेत. ही गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. मी खूप बोलते हे अगदी खरं आहे. मात्र माझा स्वभावच तसा झाला आहे. कोणतीही प्रतिमा तयार करण्यासाठी मी जास्तीचे बोलत नाही." असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

Post a Comment

0 Comments