सांगोला चोरट्याने सोने, चांदीचे दागिने, पैठणी साड्यांसह ३० हजार केले लंपास
सांगोला मळ्यात चोर आल्याने सावधगिरीसाठी घरमालक शेजाऱ्यांसमवेत घराबाहेर पडल्याची संधी साधून चोरट्याने घरात प्रवेश करून लोखंडी पेटीतील दीड तोळे सोने व १५ भार चांदीचे दागिने, तीन पैठणी साड्यांसह रोख ३० हजार रुपये, असा ७२ हजारांचा ऐवज लंपास केला.
ही घटना रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास शिरभावी (ता.सांगोला) येथील जगदाळे मळ्यात घडली. याबाबत बाळासो तुळशीराम जगदाळे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
जगदाळे मळा येथील बाळासो जगदाळे यांनी झोपताना दुसऱ्या खोलीचा दरवाजा पुढे केला. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने सदरचा दरवाजा उघडून खोलीत प्रवेश करत लोखंडी पेटीतील अर्धा तोळे सोन्याची बोरमाळ, ४ ग्रॅमचे कानातील..
वेल, ५ ग्रॅमचे झुबे, १० भार चांदीच्या जुन्या माळ्या व भाराचा चांदीचा करेडा, ३ हजारांच्या तीन पैठणी सायसिह रोख ३० हजार रुपये असा ऐवज चोरून नेला. त्यांनी कुटुंबासह चोरीला गेलेल्या लोखंडी पेटीचा घराच्या आजूबाजूला शोध घेतला असता काही अंतरावर पेटी पडल्याचे पाहिले. मात्र, पेटीतील पैसे सोने, चांदीचे दागिने मिळून आले नाहीत.


0 Comments