google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी:चंद्रकांत पाटील यांनी मागितली जाहीर माफी!

Breaking News

मोठी बातमी:चंद्रकांत पाटील यांनी मागितली जाहीर माफी!

 मोठी बातमी:चंद्रकांत पाटील यांनी मागितली जाहीर माफी!



मुंबई: भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यावरून जाहीर माफी मागितली आहे. पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. 

माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे. त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले’.तसेच ते पुढे म्हणाले, ‘ मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. 

पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत . शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटते. मी पुन्हा एकदा ह्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहिर माफी मागतो’, असे वक्तव्य त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments