google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मांत्रिकाने मुलीची हत्या करून मृतदेह घरातच पुरला

Breaking News

मांत्रिकाने मुलीची हत्या करून मृतदेह घरातच पुरला

मांत्रिकाने मुलीची हत्या करून मृतदेह घरातच पुरला 

वाळूज येथे एका मांत्रिकाने पोटच्या 22 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केली. 

दुर्गंधी सुटू नये म्हणून मीठ लावून मृतदेह घरातील किचन ओटय़ात पुरला. त्यावर शेंदूर फासलेला दगड ठेवून कुटुंबासह फरार झाला. धक्कादायक प्रकार आज बुधवारी दुपारी उघडकीस आला. या भयंकर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी खुनी मांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

वाळूज येथील समता कॉलनीत सूर्यकांत शेळके यांची दुमजली इमारत आहे. येथे काकासाहेब नामदेव भुईगड (मूळ गाव धानोरा, ता. फुलंब्री) हा मांत्रिक पत्नी व दोन मुलींसह 20 मे 2022 मध्ये भाडेकरू म्हणून राहण्यासाठी आला होता.

Post a Comment

0 Comments