आरोपीनी आधी शीर कापलं त्यांनतर काढल्या सेल्फी
झारखंड - जमिनीच्या वादातून 2 कुटुंबात वाद इतका विकोपाला गेला की यामध्ये भावाने भावाची निर्घृण हत्या करीत त्याचे शीर धडावेगळे केले, इतकेच नव्हे तर त्या शिरासोबत सेल्फी काढल्या.मुरहू परिसरात राहणाऱ्या 20 वर्षीय आदिवासी तरुणाने 24 वर्षीय चुलत भावाची हत्या केली या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे.
1 डिसेंम्बरला कानू मंडल हा घरी एकटा होता, त्याचे कुटुंब शेतात काम करायला गेले होते, सायंकाळी कुटुंब घरी आले तेव्हा घरी कुणी आढळले नाही, कानू चा सर्वत्र शोध घेण्यात आला,
कानू च्या वडिलांना माहिती मिळाली की चुलत भाऊ व त्याच्या मित्रांनी कानू चे अपहरण केले.वडिलांनी अपहरणाची तक्रार पोलीस ठाण्यात दिली, उपविभागीय पोलीस अधिकारी अमित कुमार व कर्मचाऱ्यांनी कानू चा शोध घेण्यासाठी पथक तयार केले.
आरोपींना अटक केल्यावर त्यांची कसून चौकशी केली असता कानू ची गळा कापून हत्या करण्यात आली असल्याची कबुली आरोपीनी दिली.जंगलात कानू चे धड पोलिसांना मिळाले, 15 किलोमीटर दूर कानू चे शीर पोलिसांना आढळले. पोलिसांनी आरोपी कडून 5 मोबाईल 2 धारदार शस्त्र व एक वाहन जप्त केले.
जमिनीच्या तुकड्यासाठी कानू ची हत्या करण्यात आली, त्यानंतर आरोपीनी कानूच्या शिरासोबत सेल्फी ही काढली.
0 Comments