आत्ताची सर्वात मोठी बातमी : मुख्यमंत्री, मंत्री, आयएएस अधिकारी येणार लोकायुक्ताच्या कक्षेत, लोकायुक्त कायद्याला मंत्रीमंडळाची मंजूरी
नव्या लोकायुक्त कायद्याला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
पाच लोकायुक्तांची समिती नेमण्यात येणार आहे. या लोकयुक्तांच्या समितीमध्ये न्यायमुर्तींचा समावेश असणार असून राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री, आयएएस अधिकारीही राज्यातील नव्या लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत येणार आहेत.
2019 साली अन्ना हजारे यांनी केलेल्या उपोषणानंतर तत्कालीन फडणवीस सरकारने लोकायुक्त कायदा करण्याचे लेखी आश्वासन देऊन संयुक्त मसुदा समिती स्थापन केली होती. त्यानंतर आता शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अखेर लोकायुक्त कायदा मंजूर होणार आहे. याच अधिवेशनात लोकायुक्त विधेयक मांडण्यात येणार आहे.
0 Comments