google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 16 डिसेंबर चा सोलापूर बंद यशस्वी करा!

Breaking News

16 डिसेंबर चा सोलापूर बंद यशस्वी करा!

 16 डिसेंबर चा सोलापूर बंद यशस्वी करा!

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची हकालपट्टी करा तर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावे महापुरुषांचा अवमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही - कॉ.नरसय्या आडम मास्तर

सोलापूर : (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे आराध्य दैवत  रयतेचा राजा शिवछत्रपती महाराज त्याचबरोबर पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यासाठी ज्या ज्या समाज सुधारकांनी युगपुरुषांनी महापुरुषांनी आपल्या आयुष्याची राख रांगोळी केली,समाज प्रबोधन केले,असे कर्मवीर भाऊराव पाटील,शिक्षण महर्षी धोंडो कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांबद्दल एकनाथ शिंदे गट व  भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील व  तसेच अन्य आमदार खासदार,मंत्री त्याचबरोबर राज्यपाल भगतसिंग कोषयारी या सर्वांनी बेताल वक्तव्य व अनुचित विधाने करून महाराष्ट्रातल्या पुरोगामी जनतेला डीवचण्याचे काम करत आहेत. जनतेच्या भावनेला ठेच पोहोचवत आहेत.यामुळे जनतेतील आक्रोश वाढत आहे.

 अशा या बेजबाबदार,बदनामीकारक  व अवमानकारक वक्तव्यांच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी सोलापूर बंदची घोषणा देण्यात आली आहे.  महापुरुषांचा अवमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही म्हणून  हा बंद यशस्वी करा असे आवाहन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी केले. 

त्या अनुषंगाने सोमवार दिनांक 12 डिसेंबर रोजी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय - दत्त नगर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सोलापूर बंद बाबत महत्वाची  बैठक कॉ.नरसय्या आडम मास्तर व जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली  पार पडली.  

या बैठकीत पुरोगामी महाराष्ट्राचे दीपस्तंभ - विचारवंत,समाजसुधारक,समाजसेवकांचा अवमान करण्याऱ्या चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा द्यावे, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्धल अवमानकारक विधाने करण्यारे राज्यपाल भगतसिंग कोषयारी याची हकालपट्टी करा.असा आक्रोश व्यक्त करण्यात आला.

माकपचा सोलापूर बंदला जाहीर पाठिंबा असून बंदमध्ये - सोलापूर मधील व्यापारी, विडी कामगार,यंत्रमाग कामगार,छोटे-मोठे व्यापारी त्याचबरोबर सर्वसामान्य जनता उत्स्फूर्ततेने सहभागी होण्याचे आवाहन माकपाच्या वतीने केले आहे. 

प्रास्ताविक अँड.एम.एच.शेख यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अँड.अनिल वासम यांनी केले. यावेळी व्यासपीठावर माकप चे जिल्हा सचिवअँड.एम.एच.शेख,माजी नगरसेविका कामिनी आडम,सिद्धप्पा कलशेट्टी,म.युसूफ शेख मेजर,शेवंता देशमुख,अँड.अनिल वासम आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments