आताच सर्वात मोठी बातमी डिकसळ आश्रमशाळा जिल्ह्यात टॉपर
14 आणि 17 वर्षीय मुलींच्या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड.....
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील आश्रमशाळेच्या मुलींच्या 14 आणि 17 वर्षीय संघाने अंतिम सामने मोठ्या फरकाने जिंकत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला.तर याच दोन्ही संघांची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून,जिल्ह्यात डिकसळकरांचा दबदबा पहावयास मिळाला आहे.
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील आश्रमशाळा स्व.आमदार गणपतराव देशमुख यांनी गावाला दिलेली देणगीच आहे.शिक्षणाबरोबरच सर्वच क्षेत्रात ही शाळा आघाडीवर असून,2014 सालापासून ही शाळा पुणे विभागात विविध स्पर्धेत अव्वल ठरीत आहे.
सोलापूर जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या,जिल्हास्तरीय स्पर्धा आज मोहोळ येथे पार पडल्या.यामध्ये 45 संघांनी सहभाग नोंदविला होता.याच शाळेतील 14,17 आणि 19 वर्षीय मुलींच्या संघांनी सांगोला तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावित जिल्हा स्तरापर्यंत मजल मारली होती.
चौकट -:
उत्कृष्ट लिप्टर १४वर्षाखालील संघ पल्लवी ज्ञानेश्वर कोरे.
१७वर्षाखालील संघ उत्कृष्ट लिप्टर प्रतिक्षा सतिश कोरे.
मोहोळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष मा.रमेश बारस्कर यांचेकडून कोमल व्हरगर या खेळाडूला बेस्ट स्मॅशर साठी ५०००रुबक्षीस दिले.
आज मोहोळ येथे झालेल्या स्पर्धेत 14 वर्षीय संघाने मोहोळ संघांचा सरळ सेटने पराभव करीत,एकतर्फी विजय मिळविला तर 17 वर्षीय मुलींच्या संघाने माळशिरस संघाचा 15_4 आणि 15_6 अशा गुणांनी विजय मिळविला. तर 19 वर्षीय संघाचा विजय समीप असतानाच चुकीच्या निर्णयाने फटका बसला येथे वयाचेही अडथळे आले.
असे असले तरी दोन्ही संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.याच सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक भारत यादव,काकासाहेब करांडे,अश्विनी भूसनर यांचे मार्गदर्शन लाभले.यासर्व यशस्वी खेळाडूंचे मुख्याध्यापक,प्रशाळेने तसेच संस्थेने अभिनंदन केले आहे


0 Comments