महाराष्ट्रात राजकीय लफडयात जनता त्रस्त”जत,पंढरपूर, सोलापूर इत्यादी मराठी गावांच वाढतं कर्नाटक प्रेम..
हिंदुस्थान स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत ज्या छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,राजश्री शाहू,प्रबोधनकार ठाकरे पासून संत तुकाराम..इत्यादी पासून महापुरुष ते बहुजन शिक्षण बंदी असताना संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श पर्यन्त यांचा घटनेवर देश चालतो असे यांचा नावाचा गैरवापर करून पेशवाई ते अंधश्रद्धा ,गुलामगिरी पसरवणारे राजकीय पोळी भाजणारे स्वार्थी मराठी महाराष्ट्रीयन राजकीय नेते यांना येथील जनता वैतागली आहे.
महाराष्ट्रात संत,महात्मे, महापुरुष निर्माण झाले त्यांच्या ज्ञानाचा वापराने जग सुधारले पण मराठी आपले भाऊ- भाऊ अजून एकमेकांच पाय ओढण्यात व्यस्त आहेत.
जवळपास 2 वर्ष कोरोना ते शिवसेना कुणाची वाद पासून वाढते धार्मिक वाद यातून जवळपास 10-12 वर्षांपासून सत्ता कुणाची पेक्षा महाराष्ट्रात पाण्याच्या प्रश्नांबरोबर विभाजनाचा प्रश्न, बेरोजगार,शेतकरी, शिक्षण, रस्ता, आरोग्य, शासकीय विभागातील रिक्त जागांचा प्रश्न गंभीर आहे.
अनेक वर्षांपासून रिक्त जागाच भरला जात नाही. विकास कामे होत नाहीत. अनुशेष भरून जात नसल्याने महाराष्ट्र सीमावासीय लोकांमध्ये आता सरकार बद्दल असंतोष निर्माण होत आहे.
सद्या जवळपास महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात जत तालुका विस्ताराने सर्वात मोठा. तालुक्यात १२३ गावे व २७६ वाड्या-वस्त्या आहेत. दोन लाख २४ हजार ५३८ चौरस किलोमीटर आहे. हिंगोली जिल्ह्याइतके या तालुक्याचे क्षेत्रफळ आहे. पंचायत समिती, आरोग विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग, पोलीस ठाणे यामधील अनेक पदे रिक्त आहेत. बेरोजगारी, उच्च शिक्षण, औद्योगिकीकरण, दळणवळण यापासून मागे आहोत.
महाराष्ट्रात तालुका विभाजनाच्या प्रश्नाचे तीस वर्षांपासून भिजत घोंगडे पडले आहे. तालुका विस्ताराने मोठा असल्यामुळे विकासकामे रखडली आहेत. तालुका सर्वात मोठा असल्याने येणारा निधी कमी आहे. पायाभूत सुविधांचा अभाव आहे. ३८२ किलोमीटर लांबीचे प्रमुख १३ जिल्हा मार्ग आहेत. इतर जिल्हा मार्गाची लांबी ५६८ किलोमीटर आहे. मात्र रस्त्याची अवस्था बिकट आहे.
तालुक्यात कृषी, इंजिनिअरिंग, वैद्यकीय कॉलेज नाहीत. मराठी, कन्नड व ऊर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. २७८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दोन ग्रामीण रुग्णालय, ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने आरोग्य सुविधा व्यवस्थित मिळत नाहीत. पशुवैद्यकीय विभागाचीही पदे रिक्त आहेत.
यातचं वाढता राजकीय वाद बेळगाव, सोलापूर पासून आता शेतकरी प्रश्न ते वाराणसी धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर करण्यासाठी चालू सरकार,स्थानिक लोक याबाबत उदासीन आहेत.
यानुसार राजकीय गुजराती प्रेमात -विविध पक्ष आमदार खासदर खरेदी विक्री,वाढते भक्त लफडयात मराठी माणसाची गोची झाली आहे. यानुसार कर्नाटकात जाण्याचे मराठी माणूस मानसिकता काय आहे ? यांनी हे अस का याबाबत आढावा घेतला असता..
१- मराठी शाळांचे काय झाले ?
तालुक्यातील सीमावर्ती भागात राज्य शासनाने २०१२ मध्ये माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु गेल्या दहा वर्षांपासून शाळेचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे.
२- शेतीपंपासाठी मोफत वीज.
३-६० वर्षावरील व्यक्तीला प्रतिमहिना पेन्शन.
४-शेतकऱ्यांना रब्बी आणि खरीप हंगामातील पिकांची पेरणी करण्यासाठी सवलतीच्या दरात बी बियाणे व रासायनिक खते उपलब्ध.
तेथील कर्नाटक बस -वेळोवेळी आपल्या कर्मचारी यांना विविध सुविधा देताना ते जीवापाड प्रवासी यांची काळजी घेऊन ने आन करत असतात..आमचे महाराष्ट्रात तीच लाल परी बदल नाही , बस प्रवासी हाल सोडा ,आमचे राज्य सरकार खाजगीकरणसाठी उतावीळ आहे
तर..कर्नाटकात
५-शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळते.
६- ५ रुपये किलो दराने दुकानात ३० किलो तांदूळ
७- सीमा लगत भागातील विद्यार्थ्यांना गडीनाडू प्रमाणपत्र आधारे नोकरी इंजिनिअरिंग वैद्यकीय प्रवेश दिला जातो.
८- तीन लाखापर्यंत बिगर व्याज कर्ज.
इत्यादी पासून उदासीन ,जनता दुर्लक्षित प्रश्न
सीमा भागातील प्रश्नांवर कोणतेही सरकारने गांभीर्याने घेतले नाही.
९-कर्नाटकात जनतेला विविध सेवा सुविधा, मिळत असल्याने कर्नाटकाचे आकर्षण आहे.
१०- तर तालुका विभाजनाच्या प्रश्नाचे तीस वर्षांपासून भिजत घोंगडे पडले आहे.
तर कर्नाटकात जाण्याची इच्छा नाही. शासनाने सीमा भागातील तालुक्यांसाठी खास बाब म्हणून धोरणात्मक निर्णय घेऊन मूलभूत सेवा, बेरोजगार, उद्योग, शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदान द्यावे. शाश्वत विकासासाठी तातडीने कृती कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. – विक्रम ढोणे, सामाजिक कार्यकर्ते असे छातीठोकपणे सांगत आहेत.
पण महाराष्ट्रात अजूनही बेरोजगारी, देशात सगळयात जास्त वीज,इंधन,gst महागाई,शेतकरी- शैक्षणिक दुरवस्था, इत्यादी महागाई -जनता वसुली बाबत मराठी राजकीय नेते कोणतीही कसूर ठेवत नाहीत असा ही जनतेत रोष आहे.
जिथं पिकत तिथं विकत नाही नुसार जगात छत्रपती शिवाजी महाराज , तथागत गौतम बुद्ध पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर,ते आणा भाऊ साठे,महात्मा फुले इत्यादी शिकवणी-आदर्श विचार जगाने आत्मसात केल्या, जग सुधारल. पण आमचे मराठी-महाराष्ट्रीयन आमचे भाऊ-भाऊ आपलंच शहाणपण शिकवणे ते एकमेकांचे पाय ओढण्यात व्यस्त आहेत.अशी जनतेत चर्चा आहे.


0 Comments