महसूल कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणूकीत सांगोला येथील कर्तव्यदक्ष तलाठी कुमाररवी राजवाडे रिंगणात "
महसूल कर्मचाऱ्यांच्या वाढत्या पाठींब्याने राजवाडेचाच विजय निश्चित
सांगोल- : श्री स्वामी समर्थ पॅनल कडून सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 15 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, अनुसूचित जाती सदस्य मधून
सांगोला येथील कर्तव्यदक्ष तलाठी कुमार रवी अशोक राजवाडे यांना संपूर्ण जिल्ह्यामधून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील महसुल कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक गाठीभेटी, घेवून प्रत्येक तालुक्यात जंगी सभा संपन्न झाल्या आहेत.
श्री स्वामी समर्थ पॅनल कडून सर्वसाधारण सदस्य मधून सादिक काझी, बाबा कांबळे,शरद खंडागळे,सिद्धाराम जमादार ,ज्ञानेश्वर बोराडे, रियाज भाईजान, भीमाशंकर भूर्ले, नितीन मेटकरी, उमेश सूर्यवंशी, कुलदीप सोनवणे तर
महिला सदस्य म्हणून सुनिता ढोणे,वर्षा बरबडे , अनु जातीमधून कुमार रवी राजवाडे, भटक्या जातीमधून नंदकिशोर दांडगे,तर इतर मागास प्रवर्गातून पांडुरंग हिप्परकर हे निवडणूक रिंगणात असून सर्व समावेशक पॅनल असल्याने महसूल कर्मचाऱ्यांचा वरील सर्व उमेदवारांना वाढता पाठिंबा मिळत आहे.
सर्वसाधारण सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्थेमध्ये स्वामी समर्थ पॅनल कडून पतसंस्थेचे सर्व व्यवहार ऑनलाइन डिजिटल करणार असल्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, त्याचप्रमाणे सद्यस्थितीत तातडीची कर्ज मर्यादा वीस हजार रुपये असून त्यामध्ये वाढ करून 50 हजार रुपये करणार,मासिक वर्गणी मध्ये वाढ करून
ती अडीच हजार रुपये करून पतसंस्थेच्या कायम ठेवीमध्ये वाढ करणार, सभासदांसाठी 0.5 ते 1% व्याजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार तसेच दिव्यांग व महिला सभासदांसाठी 1.5 टक्के कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्हा तलाठी संघ पुरस्कृत श्री स्वामी समर्थ पॅनल सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूक 2022/ 2023 नुकतीच जाहीर झाली असून रविवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते पाच या वेळेत नूतन मराठी विद्यालय प्राथमिक शाळा सोलापूर येथे ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
पॅनल प्रमुख राजकुमारजी पांडेकर,माजी जिल्हाध्यक्ष मकानदार साहेब, जिल्हा सचिव विजय विजापूरे, निवडणूक प्रमुख संतोष सुरवसे, जिल्हा सल्लागार रियाज भायजान, जिल्हा संघटक दिनेश भडगे, तालुका अध्यक्ष हरीशचंद्र जाधव,उपाध्यक्ष दिनेश सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष बबन गायकवाड, स्टार प्रचारक साईनाथ रामोड आदि मान्यवर सदर निवडणुक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.


0 Comments