माझी बायको होशील का…?: १४ वर्षीय मुलाने केला १३ वर्षीय मुलीचा विनयभंग!
पुणे: पुण्यातील हडपसर येथील एका नामांकीत शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने त्याच्याच शाळेतील मुलीचा विनयभंग केला आहे.
१४ वर्षीय मुलाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केला आहे.माहितीनुसार, हे दोघे एकाच शाळेतील विद्यार्थी असून मुलगा पीडित मुलीला खूप दिवसांपासून त्रास देत होता. त्याने मैत्रीसाठी मुलीला धमकी देखील दिली होती.
माझ्याशी मैत्री केली नाही तर मी तुला उचलून घेऊन जाईल अशी धमकी मुलाने दिली होती. कितीही प्रयत्न केले तरी मुलगी मैत्री करण्यास तयार नसल्याने मुलाने वेगळी शक्कल लढवत पीडितेचा फोटो त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवला आणि कॅप्शनमध्ये माझी बायको होशील का असे लिहिले.
हे पाहून मुलीने सर्व प्रकार घरी सांगण्याचा निर्णय घेतला. तिने आईला सर्व घटना सांगितली.दरम्यान, पीडित मुलीच्या आईने लगेचच पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत सदर मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस या प्रकरणी पुढील चौकशी करत आहेत.


0 Comments