google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तिप्पेहाळी येथे रामा फलटणे ट्रस्टच्या वतीने डाळिंबाचे भरघोस उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्याचा सत्कार संपन्न.

Breaking News

तिप्पेहाळी येथे रामा फलटणे ट्रस्टच्या वतीने डाळिंबाचे भरघोस उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्याचा सत्कार संपन्न.

 तिप्पेहाळी येथे रामा फलटणे ट्रस्टच्या वतीने डाळिंबाचे भरघोस उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्याचा सत्कार संपन्न.


कोळा वार्ताहर सांगोला तालुक्यातील तिप्पेहाळी येथे रामा फलटणे ट्रस्टचे अध्यक्ष व उद्योगपती इंजिनिअर अशोकआबा नरळे यांच्या संकल्पनेतून कोळा परिसरातील डाळिंबाचे भरघोस उत्पादन घेतल्याबद्दल जुजारपुरचे प्रगतशील बागायतदार मच्छिंद्र हिप्परकर, गौडवाडीचे अण्णा गडदे, नाना माळी , बजरंग हिप्परकर , कलाप्पा गडदे , 

शिवाजी हिप्परकर, श्रीमंत अण्णा बजबळकर या शेतकऱ्यांचा तसेच युवा उद्योजक अविनाश शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त तिप्पेहाळी गावचे माजी सरपंच व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबासों नरळे व रामा फलटणे ट्रस्टचे अध्यक्ष इंजि व उद्योगपती अशोक आबा नरळे यांच्या हस्ते शाल.  श्रीफळ व फेटा बांधून  सन्मानपूर्वक सत्कार सोहळा पार पडला. यावेळी  नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने होते.

यावेळी बोलताना इंजिनीयर अशोक आबा नरळे म्हणाले सांगोल्याच्या पश्चिम भागातील जुजारपूर गौडवाडी बुध्याळ करांडेवाडी कोळा या परिसरातील प्रगतशील बागायतदार मच्छिंद्र हिप्परकर, अण्णा गडदे, नाना माळी, बजरंग हिप्परकर,  कलाप्पा गडदे , शिवाजी हिप्परकर यांचा सत्कार करताना आनंद होत आहे

 यांनी रात्रीचा दिवस करून डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतले व आपले डाळिंब पदेशात पाठवून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे त्यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांचे मी अभिनंदन करतो सध्याच्या काळात तरुण पिढीने नोकरीच्या च्या मागे न लागता या गोष्टीचा आदर्श घेतला पाहिजे तरुण वर्गाने उतम प्रकारे शेती करावी 

 आपल्या भागातील भरघोस उत्पादन घेतलेले शेतकरी इतर ठिकाणी कोणतेही शुल्क न घेता शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन स्वखर्चाने मार्गदर्शन आणि सल्ला देतात यांचे विशेष कौतुक वाटते असे इंजिनीयर उद्योगपती अशोक आबा रामचंद्र नरळे यांनी शेवटी सांगितले.

 यावेळी उपस्थित सर्व प्रगदशील बागायतदारांनी स्वतःचा डाळिंबाच्या बागेचा अनुभव सांगून मार्गदर्शन केले. 

 या कार्यक्रमास माजी सरपंच अरुण बजबळकर, माजी सरपंच काका नरळे ज्येष्ठ नेते श्रीमंत अण्णा बजबळकर, विठ्ठल नरळे,

 पत्रकार जगदीश कुलकर्णी पांडुरंग नरळे, प्रगतशील बागायतदार विलास नरळे, जयवंत नरळे ,उदय नरळे गुरुजी, पोलीस पाटील राजू पाटील,  विजय बजबळकर, प्रकाश माने, पांडुरंग ज. नरळे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  विष्णु नरळे, ईश्वर बजबळकर, सुहास माने दत्ता नरळे यांच्यासह नरळे- फलटणे परिवाराने परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments