आरेवाडी बिरोबाबन देवस्थान ट्रस्ट व्यावस्थापण कार्यालयात प्रेम प्रकरणातून तरूणाचा सपासप वार करून खून
सांगली कवठेमंकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा देवस्थान मंदिरासमोरील देवस्थान ट्रस्टीच्या व्यवस्थापन कार्यालयात दरवाजाला आतून कडी लावून तरुणांचा बोसकून खून.
कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी बिरोबा देवस्थान ट्रस्ट व्यावस्थापण कार्यालयात मारुती उर्फ नाना जगन्नाथ कोळेकर बसला असता मुलीच्या प्रेम प्रकरणातून चिडून गावातीलच चौघा तरूणानी संगनमत करून कार्यालयात एकटा कोंडून धारदार शस्त्राने मानेवर,पाठीवर,हातावर, पोटावर,डोकीत सपासप वार केले आहेत.
धारदार शस्त्राने घाव वर्मी बसल्याने मारूती उर्फ नाना जगन्नाथ कोळेकर जागीच गतप्राण झाला आहे.सदर घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून कवठेमंहाकाळ पोलीस ठाण्यात चार आरोपींवर विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की अरेवाडी येथील कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ (आबा) कोळेकर यांचा मुलगा मारूती उर्फ नाना जगन्नाथ कोळेकर यांचे एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे कारणावरून
शाब्दिक चकमक झाली होती.याचा राग मनात धरून मारूती उर्फ नाना जगन्नाथ कोळेकर हा देवस्थान समितीच्या कार्यालयात बसला होता. देवस्थान परिसरात गर्दी झाली होती.अचानक चार तरुण जबरदस्तीने कार्यालयात प्रवेश केला आणि आतून दाराची कडी लावून मारूती उर्फ नाना जगन्नाथ कोळेकर याचेवर पोटावर,पाठीवर,मानेवर, डोक्यात, हातावर चाकूने सपास वार केले.
यात मारूती उर्फ नाना कोळेकर गंभीर जखमी झाल्याने़ तातडीने त्याला मिरज शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र दवाखान्यात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आले.या घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली असता
मारेकऱ्यांची चार नावे निष्पन्न झाली आहेत, अनिल श्रीरंग कोळेकर ,संजय श्रीरंग कोळेकर, इंद्रजित काशीलींग कोळेकर,अक्षय उर्फ बंडू दामजी कोळेकर सर्व रहाणारं आरेवाडी अमोल युवराज घागरे राहणारढालगांव हत्यार पुरवणार अशी त्यांची नावे असून सर्व आरोपी फरार झाले आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींना लवकरच अटक करू, आरोपींच्या शोधासाठी दोन पदके रवाना केली असल्याची माहिती कवठेमंहाकाळ पोलीसांनी दिली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे कवठेमहांकाळ पुढील तपास करीत आहेत.


0 Comments