google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 “मुंबई महापालिका स्वबळावर लढणार आहे”: ‘यांचे’ मोठे वक्तव्य!

Breaking News

“मुंबई महापालिका स्वबळावर लढणार आहे”: ‘यांचे’ मोठे वक्तव्य!

 “मुंबई महापालिका स्वबळावर लढणार आहे”: ‘यांचे’ मोठे वक्तव्य!

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.

 याचदरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र्य लढणार असल्याची घोषणा केली आहे.राज ठाकरे म्हणाले, ‘मुंबई महापालिका स्वबळावर लढणार आहे. माझ्या पक्षाला सोळा सतरा वर्षे झाली. भाजपच्या हातात २०१४ मध्ये सत्ता आली. १९५२ साली भाजप आणि शिवसेना १९६६ मध्ये स्थापन झाली. 

त्यांना १९८५ साल उजाडावं लागलं, मुंबई महापालिका हाती यायला’.तसेच, ‘सीमावादाचा प्रश्न मध्येच कसा वर येतो? काही गोष्टींकडून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न होतोय का? याचा पत्रकार म्हणून तुम्हीही शोध घेतला पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

Post a Comment

0 Comments