google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, सगळं एकदम ओक्के'. आसामच्या खुद्द मुख्यमंत्र्यांना शहाजी बापूंच्या डायलॉगची भुरळ

Breaking News

'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, सगळं एकदम ओक्के'. आसामच्या खुद्द मुख्यमंत्र्यांना शहाजी बापूंच्या डायलॉगची भुरळ

'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, सगळं एकदम ओक्के'. आसामच्या खुद्द मुख्यमंत्र्यांना शहाजी बापूंच्या डायलॉगची भुरळ

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक मंत्री आमदार, खासदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला गेले आहेत. या दरम्यान पुन्हा चर्चा झाली टी गुवाहाटीच्या सौंदर्याची. गुवाहाटीच्या या दौऱ्यात पुन्हा चर्चेत आले ते म्हणजे आमदार शहाजी बापू पाटील.

शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार खासदार राज्यातून सुरतला गेले आणि तिकडून गुवाहाटीला. यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील ठाकरे यांना सोडून शिंदे गटात गेले आणि तेही गुवाहाटीला जाऊन पोहोचले. गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांना सांगोल्यातून आलेला एक फोन प्रचंड व्हायरल झाला. 

त्या फोन कॉलमधील शहाजी बापू पाटील यांचा एक डायलॉग खूपच प्रसिद्ध झाला. 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, सगळं एकदम ओक्के'. हा डायलॉग प्रचंड व्हायरल झाला, इतकंच काय तर या डायलॉगवर गाणी देखील बनली. शहाजी बापू पाटील जिथं जातील तिथं हा डायलॉग म्हणण्याची त्यांना विनंती केली जाते आहे.

दरम्यान याच डायलॉगची भुरळ आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांना देखील पडली आहे. हेमंत बिस्वा शर्मा यांनी शहाजी बापू पाटील यांना आता गुवाहाटी दौऱ्यावर असताना काय झाडी, काय डोंगार हा डायलॅाग म्हणून दाखवायला सांगितला आहे. शहाजी बापू पाटील यांनी हा डायलॉग मराठी मध्ये ऐकवला त्यानंतर त्यांनी हाच डायलॉग इंग्रजीतही बोलून दाखवला.

Post a Comment

0 Comments