साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळा मार्फत थेट कर्ज योजने अंतर्गत कर्ज योजना
मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील दरिद्रय रेषेखालील गरजू घटकांचा आर्थिक उन्नतीसाठी,तसेच त्यांना स्वंयरोजगाराच्या अधिअधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानं शासन महामंडळामार्फत राबविण्यात येणान्या थेट कर्ज योजने अंतर्गत कर्जाची मर्यादा रक्कम रु.२५,०००/- वरून रक्कम रु.१,००,०००/- लाख पर्यंत वाढविण्यात येऊन थेट कर्ज योजना राबविण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे.
थेट कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा रक्कम रु.१.०० लाख करण्यात आलो असून यामध्ये महामंडळाचा हिस्सा रु.८५००० (८५%), अनुदान रक्कम रु. १०००० (१००%), अर्जदाराचा सहभाग रु.५००० (५%) असे एकूण १००००० (१००%). ३ वर्ष (३६ महिने) या कालावधीसाठी द.सा.द.शे. ४% व्याज दराप्रमाणे कर्ज रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. सदर योजने अंतर्गत रक्कम रु.१.०० लाख पर्यंतचे प्रकल्प मर्यादेपर्यंत असलेले लघु उदयोग करता येतील.
महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे परिपत्रक क्र. एलएसव्हीएम/व्यसं/प्रकल्प/उद्दिष्ट / १६९४ / २०२२-२३. दिनांक १४/११/२०२२ अन्वये थेट कर्ज योजना (रक्कम रु.१.०० लाख राबविणेकरिता अटी शर्ती नियम निकष व पात्रतेसह सोलापूर जिल्हयासाठी एकूण ६५ लाभार्थींचे रक्कम रु.६५.०० लाखाचे उदिष्ट प्राप्त झाले आहे.
उदिष्ट वितरण - सदर योजनेत साधारणपणे पुरुष ५०% व महिला ५०% आरक्षण राहील.
१. ग्रामिण भागासाठी प्राधान्य राहील.
२. राज्यस्तरावरील क्रिडा पुरस्कार व्यक्तांना प्राध्यान राहील. ३. सैन्य दलातील बोरगती प्राप्त वारसाच्या घरातील एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यात येईल.
* सदर योजनेच्या पात्रता व निकष :-
१. अर्जदार मांग, मातंग, मिनी-मादोग, मादोग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा जातीतील असावा.
२. अर्जदार महाराष्ट्रातील रहीवाशी असावा.
३. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष असावे.
४. अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. ५. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु.३०००००/- (तीन लाख यापेक्षा जास्त नसावे.
६. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल. ७. अर्जदाराने अर्जासोबत आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल सादर करावा.
८. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव/प्रशिक्षीत असावा. ९. अर्जदाराचा Cibil Credit Score ५०० च्या वर असावा.
*कर्ज मागणी अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे व दस्तऐवज खालीलप्रमाणे.:-
१. जातीचा दाखला (सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा) २. अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (रु.३०००००/- पर्यंत)
३. नुकतेच काढलेले फोटो (दोन)
४. अर्जदाराचा शैक्षणिक पुरावा / शाळेचा दाखला
५. आधार कार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड
६. ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा आहे. त्या जागा उपलब्धंचा पुरावा ( भाडे पावती, ७. व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र व अनुभव दाखला.
करारपत्र)
८. यापूर्वी शासकीय कर्ज योजनेचा व अनुभव घेतल्याचे प्रमाणपत्र फोडेण्टीसह.
११. अर्जदारास महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरूप असलेली आवश्यक ती कागदपत्रे प्रमाणपत्रे / करारपत्रे कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
कर्ज प्रक्रिया :-
१. कर्ज प्रकरण कार्यालयाकडे प्राप्त झाल्यास, परिपूर्ण असे कर्ज प्रस्ताव लाभार्थीच्या निवडीसाठी, प्रथम लाभार्थी निवड समितीच्या मान्यतेसाठी व मंजूरीस्तव सादर करण्यात येतील.
२. प्राप्त झालेले कर्ज प्रस्तावाची संख्या उद्दिष्टांपेक्षा जास्त असल्यास, लाभार्थीची निवड चिठ्ठीव्दारे लॉटरी पध्दतीने) करण्यात येईल.
३. अर्जदाराच्या Cibil Credit Score ५०० च्या वर आहे किंवा कसे याबाबत कर्ज मंजूर झाल्यानंतर अहवाल सादर करावा लागेल. ४. कर्ज मंजूरीची प्रक्रिया झाल्यानंतर कर्ज प्रकरणी कर्ज वसुलीसाठी दोन सक्षम जामिनदार घेण्यात येतील.
१. ०१- जामिनदार शासकीय/निमशासकीय नोकरदार / अनुदानीत संस्था मधील कर्मचारी असावा, त्यांचे कार्यालयाकडून वसुलीसाठी हमीपत्र घ्यावे लागेल. (जामिनदार कागदपत्रे रु.१०० बॉन्डवर प्रतिज्ञापत्र, कार्यालयाचे ओळखपत्र, मागील ०३ महिन्याचे पगार पत्रक, मागील ०६ महिने बैंक स्टेटमेंट पासबुक झेरॉक्स, आधारकार्ड, पॅन कार्ड, रेशनकार्ड झेरॉक्स ०२ फोटो.इ.)
२. ०१ जामिनदार मालमत्ताधारक / जमीनदार असावा, त्यांचे मालमत्तेवर महामंडळाच्या नावे कर्जाचा बोजा नोंद करावा लागेल. ( जामिनदार कागदपत्रे ७/१२ किंवा ८ अ उत्तारा, आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅन कार्ड, रु.१२०० बॉन्डवर प्रतिज्ञापत्र व इ.)
४. सहभाग रक्कमेपोटी रु.५०००/- चा धनाकर्ष महामंडळाचे नावे जमा करावा लागेल.
५. कर्ज वितरणापुर्वी लाभार्थीकडून वसुलीपोटी २० उत्तर दिनांकित धनादेश घेण्यात येतील.
६. कर्जदाराच्या वारसाचे रु.१००/- च्या बॉन्डवर वारसदार म्हणून प्रतिज्ञापत्र,
७. इतर वैद्यानिक दस्ताऐवजांची पुर्तता करणे बंधनकारक आहे.
८. ३ वर्ष (३६ महिने कालावधीसाठी द.सा.द.शे. ४% व्याज दराने कर्ज रक्कम वितरीत केली जाईल.
जिल्हा कार्यालय सोलापूर मार्फत थेट कर्ज योजनेमध्ये कर्ज मागणी अर्ज वितरण दिनांक (२९/११/२०२२ ते दिनांक २०/२२ / २०२२ पर्यंत करण्यात येणार असून व कागदपत्रांच्या पुर्ततेसह दिनांक २९/११/२०२२ ते २०/१२/२०२२ रोजी पर्यंत अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही करण्यात येणार आहेत.
तरी इच्छुक मांग, मातंग, मिनी मादोग, मादोग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील गरजू व होतकरुनी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे, बीग बजार समोर, सोलापूर येथे मूळ जातीचा दाखला, आधारकार्ड व इतर कागदपत्रासह स्वतः उपस्थित रहावे,
व्यस्थांकडे अर्ज दिला जाणार नाही किंवा अर्ज स्विकारला जाणार, या करिता कार्यालयात स्वतः प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहणे बंधनकार आहे, असे आवाहन श्री.टि. आर. शिंदे, जिल्हा व्यवस्थापक, सोलापूर यांनी केले आहे.



0 Comments