google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये १० वर्षीय मुलीची अत्यल्प दरात यशस्वी शस्त्रक्रिया संपन्न

Breaking News

वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये १० वर्षीय मुलीची अत्यल्प दरात यशस्वी शस्त्रक्रिया संपन्न

 वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये १० वर्षीय मुलीची अत्यल्प दरात यशस्वी शस्त्रक्रिया संपन्न

वाढेगावच्या हजारे कुटुंबाला मिळाला आपुलकीचा आधार!

सांगोला (प्रतिनिधी): वाढेगाव येथील रहिवासी असलेल्या दहा वर्षीय मुलीच्या हार्नियाची शस्त्रक्रिया करुन तिचा आजार दूर करण्यासाठी वेदांत हॉस्पिटलच्या टीमसह आपुलकी प्रतिष्ठान धावून आले आणि वेळेत वैद्यकिय उपचार मिळून शस्त्रक्रिया यशस्वी झाली. कमी खर्चात वेदांत हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाल्यामुळे हजारे कुटुंबियांना मोठा आधार मिळाला.  

वाढेगाव येथील श्री. गजानन हजारे व त्यांची पत्नी मोलमजूरी करतात. त्यांची मुलगी कु. सुवर्णा (वय १० वर्ष ) हिला ६-८ महिने झाले पोटात दुखण्याचा त्रास होत होता. डॉक्टरांनी त्यांना सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला होता.

सोनोग्राफी मध्ये  हार्निया असल्याचे निदान  २८ सप्टेंबर रोजी झाले. निदान झाल्यानंतर मिरज, सांगलीच्या हॉस्पिटलला जावून ऑपरेशन करण्याचे काहींनी सुचविले.परंतु मोलमजूरी करुन कुटुंब चालविणाऱ्या हजारे कुटुंबियांची  परिस्थिती नसताना सुध्दा मुलीला होत असलेल्या वेदना व त्रास पाहून सांगली- मिरजचे हॉस्पिटल गाठले. 

परंतु तिथे शस्त्रक्रियेचा खर्च मोठा सांगितला गेल्याने शस्त्रक्रिया न करताच  त्यांना परत यावे लागले. परत आल्यानंतर  हजारे यांनी जवळपास संपर्क साधून मदतीसाठी चौकशी केल्यानंतर वाढेगाव येथील श्री. एन.डी पाटील सर व श्री.सिध्देश्‍वर बागल यांनी हजारे कुटुंबियांना मदत करण्याचे ठरवले. त्याचबरोबर 

श्री. संभाजी (पिंटू) पाटील यांनी आपुलकी प्रतिष्ठानकडेही संपर्क साधून माहिती दिली. आपुलकीचे सदस्य श्री.अरविंद केदार यांनी वेदांत हॉस्पिटलचे डॉ. निरंजन केदार यांच्याशी चर्चा केल्यानंतर या मुलीची शस्त्रक्रिया सामाजिक बांधिलकी जोपासत वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगोला येथे अत्यल्प खर्चात करण्याची तयारी दर्शवली व अल्प खर्चात 

कु. सुवर्णा हजारे हिची शस्त्रक्रिया प्रसिध्द सर्जन डॉ. अमर शेंडे व भूलतज्ञ डॉ. सुरेश वरशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी यशस्वीरित्या पार पडली. यासाठी  डॉ.आण्णासाहेब लवटे ,डॉ.परेश खंडागळे ,डॉ.निरंजन केदार तसेच  वेदांत हॉस्पिटलचे सर्व डायरेक्टरर्स ,नर्सिंग स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेवून या हजारे कुटुंबाबद्दल आपुलकी दाखवली. 

अल्प खर्चात शस्त्रक्रिया करुन अडल्या नडलेल्यांना मदत करुन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य वेदांत हॉस्पिटल टीमने केल्याबद्दल हजारे कुटुंबियांनी  हॉस्पिटल टीम तसेच आर्थिक मदत करणारे एन.डी.पाटील सर, सिध्देश्‍वर बागल व आपुलकी प्रतिष्ठानचे आभार मानले. 

बुधवारी सायंकाळी हजारे कुटुंबियांना मदतीचा धनादेश वेदांत हॉस्पिटल येथे देण्यात आला. यावेळी वेदांत हॉस्पिटलचे डायरेक्टर, आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, सहसचिव शरणप्पा हळ्ळीसागर,  अरविंद केदार, हरीभाऊ जगताप, पिंटू पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments