खा. रणजीतसिंह नाईक मंडळाचा तडकाफडकी राजीनामा
रेल्वेचे अनेक प्रश्न सतत मांडूनही अधिकाऱ्यांच्या निंबाळकर यांचा रेल्वे सांगोला (प्रतिनिधी) नाकर्तेमुळामुळे सुटत नसल्याने खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी आज पुणे येथील बैठकीत आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
आज मंगळवार दी. 18 रोजी डी आर एम कार्यालय पुणे येथे बैठक आयोजीत केली होती रेल्वे समिती बैठकीत रेल्वे विभागीय मंडळाचे अध्यक्ष खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात कोविडपूर्वी ज्या स्थानकावरती रेल्वे थांबा होता त्या ठिकाणी पूर्वरत थांबा मिळावा, लोकांची गैरसोय थांबावी, विद्यार्थी, नोकरदार शेतकरी यांचे प्रश्न सुटावेत
भुयारी मार्ग, व दोन गावांनाजोडणारे रस्ते जे रेल्वे अधिकार क्षेत्रात येतात त्यासंबंधी प्रश्न, कुर्डुवाडी रेल्वे कारखाना चालू रहावा, स्टेशन सुविधा व सुधारणा, किसान रेल यासाठी वारंवार रेल्वे अधिकाऱ्यांना सांगूनही प्रश्न सुटत नसतील तर या रेल्वे मंडळ अध्यक्ष पदाचा काय उपयोग असे म्हणून त्यांनी
आज मी राजीनामा देत आहे असे सांगितले. यावेळी इतर सर्व उपस्थित खासदारांनी ही रेल्वे मंडळाच्या सदस्यांनीखा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना समर्थन देऊन यापुढे आम्ही सदस्य रेल्वे मंडळाच्या कोणत्याही बैठकीस उपस्थित राहणार नाही असे सांगितले.
याप्रसंगी खा. ओमराजे निंबाळकर, खा. जयसिद्धेश्वर स्वामी, खा. उमेश जाधव, खा. श्रीरंग बारणे खा. श्रीनिवास पाटील, खा. धैर्यशील माने, खा. हेमंत पाटील, खा. धनंजय महाडिक यांचेसह रेल्वे जी.एम. लाहोटी, डी आर एम. रेणू शर्मा तथानिलेश ढोरे उपस्थित होते


0 Comments