सांगोला सूतगिरणीच्या महिला कामगारास भरधाव कारची धडक,..
महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
सांगोला (प्रतिनिधी) कामावरून घरी परत जाणाऱ्या सूतगिरणी कामगार महिलेस कार चालकाने धडक दिल्याने महिला कामगार गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मयत झाल्याची घटना गुरुवार दि. 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास सांगोला मिरज रोडवरील सूतगिरणी समोर घडली आहे पार्वती महादेव कुंभार वय 45 रा. बुधेहाळ ता. सांगोला असे मयत झालेल्या महिलेचे नाव होय.
पार्वती कुंभार या सूतगिरणी येथे महिला कामगार म्हणून काम करतात गुरुवार दि 27 रोजी रोजी सायंकाळी पावणेपाच वा. चे सुमारास पार्वती कुंभार या सुतमिल येथे काम संपल्यानंतर घरी जाणे करीता मिरज ते सांगोला जाणारे रोडचे कडेला थांबली असताना समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या
जी. इ. - 04 - ई - 5697 या रेनॉल्ड कारने जोराची धडक दिल्याने पार्वतीकुंभार या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी सांगोला शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले कुंभार यांना बरगडी, उजवा हात मोडलेला, डोकीस, तोंडास मार लागून गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत प्रताप महादेव कुंभार यांनी कार चालक गोपी दिगंबर गोवेकर रा. घर नं.697 सी. के. डॉ. मायम बिचोलिम गोवा याने त्याचे ताब्यातील वाहन हयगईने, अविचाराने, रोडचे परस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवुन रोडचे बाजुस उभे असलेल्या पार्वती कुंभार हिस गंभीर जखमी करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


0 Comments