नव्या सरकारची नविन घोषणा पुस्तकांसोबत वह्याही मिळणार मोफत
सांगोला:- (शब्दरेखा एक्सप्रेस न्युज) शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबत वह्याही मोफत देण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. पुढील शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.
कमी पटसंख्येच्या शाळा होणार बंद राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, की राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याआधी तेथील विद्यार्थी व अतिरिक्त शिक्षकांची माहिती घेतली जाईल.
त्यानंतर तेथील शाळा बंद करण्याचा निर्णय होईल. तसेच कमी पटसंख्येच्या शाळा बंद झाल्या, तरी तेथील विद्यार्थ्यांचे शेजारील जवळच्या शाळांमध्ये समायोजन केले जाईल. याशिवाय विद्यार्थ्यांना शाळा लांब पडत असल्यास त्यांच्यासाठी बसची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.


0 Comments