Breaking News

शिंदे -फडणवीस सरकारचा दूसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार? फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत वाचा सविस्तर

शिंदे -फडणवीस सरकारचा दूसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार? फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत वाचा सविस्तर 

मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या आमदारांना समजावण्यासाठी शिंदे आणि भाजप सरकारने दुसर्‍या मंत्रीमंडळाचे आश्वासन दिले होते.मात्र, हा विस्तार कधी होणार याबाबत काहीच सांगितले जात नसल्याने आमदारांमध्ये अस्वस्थता होती. परंतु आता दुसरा मंत्रिमंडळ विस्तार  दिवाळीनंतर होणार असल्याचे स्पष्ट संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस  यांनी दिले आहेत.

पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या 9 आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागली होती तर भाजपच्या 9 आमदारांना संधी देण्यात आली होती.

 यामुळे शिंदे गटाचे काही आमदार नाराज झाले होते, काहींनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी दिले आहेत.

19 डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच होणार आहे. 

राज्यमंत्री असतानाही शिंदे गटात सामील झालेले बच्चू कडू  यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. आमदार संजय शिरसाट यांची नाराजीही लपून राहिली नव्हती. तसेच भरत गोगावले  अनिल बाबर,प्रकाश आबिटकर अशी नावेही चर्चेत होती.

शिंदे गट आणि भाजपाकडे समान मंत्रीपदे असल्याने दुसर्‍या मंत्रीमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील कोणत्या व किती आमदारांची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे आहे.

कारण यानंतर अनेक गोष्टी घडू शकतात. एकनाथ शिंदे यांना तर तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

शिंदे गटाचे अनेक आमदार इच्छुक असल्याने कोणाकोणाचे समाधान करायचे, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर आहे.फडणवीस यांनी रविवारी नागपूर येथे बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्पष्ट सांगितल्याने यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

 फडणवीस म्हणाले, कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ शकले नव्हते. यंदा डिसेंबरमध्ये नागपूरमध्ये दोन आठवड्यांचे अधिवेशन होईल.राज्य सरकारची तर तीन आठवडे देखील अधिवेशन चालविण्याची तयारी आहे.या अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.

Post a Comment

0 Comments