google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला भूमि अभिलेख कार्यालयात कामकाजात सुसूत्रता आणावी:- शहीद अशोक कामटे संघटना

Breaking News

सांगोला भूमि अभिलेख कार्यालयात कामकाजात सुसूत्रता आणावी:- शहीद अशोक कामटे संघटना

 सांगोला भूमि अभिलेख कार्यालयात कामकाजात सुसूत्रता आणावी

:- शहीद अशोक कामटे संघटना

सांगोला( प्रतिनिधी) सांगोला येथील भुमिअभिलेख कार्यालयात कामकाजात सुसूत्रता आणण्याकरिता शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने उपाधीक्षक भुमिअभिलेख कार्यालय सांगोला यांना निवेदन देण्यात आले.

भूमि अभिलेख कार्यालयात नागरिकांची दैनंदिन कामाकरिता गैरसोय होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या कार्यालयात नागरिकांना आपल्या कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे.

शहर व तालुक्यातील नागरिकांना नकला ,नकाशे, नागरी सुविधा यासह विविध कामे या कार्यालयात प्रलंबित आहेत या प्रकारच्या समस्या कामातील दिरंगाई यांच्या तक्रारी संघटनेकडे करण्यात आलेले आहे. सदरचे निवेदन देण्यासाठी अशोक कामटे संघटना मागील तीन दिवसापासून या कार्यालयात संघटनेचे पदाधिकारी व सदस्य जात होते.

 पण या कार्यालयात अधीक्षक हजर नव्हत्या इतर कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तर देण्यात आली या कार्यालयातील उपाधीक्षक कायम मीटिंग व इतर कार्यक्रमात व्यस्त असतात त्या सर्वसामान्यांच्या कामाबद्दल उदासीन असल्याचे दिसून येते याचा ज्येष्ठ नागरिक ,महिला यांना त्रास होत आहे यानंतरही या कार्यालयाने आपल्या कामकाजात सुसूत्रता नाही.

आणली  तर शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला या निवेदनाची प्रत मा. जिल्हाधिकारी , सोलापूर, तहसीलदार सांगोला यांनाही देण्यात आली आहे. अशी माहिती शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने देण्यात आली.

Post a Comment

0 Comments