…….म्हणून अंधेरी पूर्व पोटनिवडणूक रद्द होणार?
मुंबई: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे गटाने अंधेरी पोटनिवडणूकीतून जबरदस्तीने माघार घेण्यास भाग पाडले अशी तक्रार अपक्ष उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे केली होती. या तक्रारीची आता निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.
माहितीनुसार, निवडणुकीतून माघार घेण्यासाठी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी मला धमकी दिली आणि जबरदस्तीने निवडणूक प्रक्रियेतून माघार घेण्यास भाग पाडले, त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक प्रक्रिया रद्द करावी,
अशी तक्रार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती.दरम्यान, आता निवडणूक आयोगाने मिलिंद कांबळे यांच्या तक्रारीची दखल घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता अंधेरी निवडणुकीसंदर्भात काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.


0 Comments